Type Here to Get Search Results !

डुप्लिकेट चावीने फ्लॅटचा दरवाजा उघडून तीन लाखांचा ऐवज लांबविला

 


पुणे दि. १२ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स) : सदनिकेचा दरवाजा बनावट चावीने उघडून चोरट्याने कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा तीन लाख चार हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना हडपसर भागात घडली. चोरटा माहितगार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून चोरट्याचा शोध सुरू आहे.याबाबत विश्वजीत कांबळे (वय ३०, रा. इंद्रायणी सोसायटी, साडेसतरानळी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कांबळे कुटुंबीय सदनिका बंद करुन सकाळी अकराच्या सुमारास कामानिमित्त बाहेर पडले. चोरट्याने सदनिकेचा दरवाजा बनावट चावीने उघडला. शयनगृहातील कपाट उचकटून कपाटातील दोन लाख ८४ हजारांचे सोन्याचे दागिने तसेच २० हजारांची रोकड असा ऐवज लांबवून चोरटा पसार झाला. काही वेळानंतर कांबळे घरी परतले. तेव्हा घराचा दरवाजा उघडा असल्याचे लक्षात आले. कपाट उचकटून ऐवज लांबविल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ पडसळकर तपास करत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.