पुणे, दि.३० जुलै (चेकमेट टाईम्स): महाराष्ट्रात घडली सुन्न करणारी घटना. कोरोनात नवरा गेल्यानंतर भीक मागूनही मुलांचे पोट भरता येत नसल्याने हतबल झालेल्या एका आईने आपल्या पोटच्या मुलाला विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अंमळनेरमध्ये राहणाऱ्या या कुटुंबावर कोरोना काळात संकट ओढावलं. कुटुंबातला कमावता व्यक्ती गेला आणि संपूर्ण कुटुंबच उघड्यावर पडलं. पदरात सात मुलं आणि आर्थिक परिस्थिती बिकट असं दुहेरी संकट या महिलेवर ओढावलं. पती गेल्याचं दु:ख कमी की काय सात मुलांचं पोट भरणार कसं ही चिंताही तिला सतावत होती.
अखेर नाईलाजास्तवर या महिलेने आपलं अडीच वर्षांचं बाळ एका व्यक्तीला अवघ्या दीड हजारात विकलं. लहान बाळाच्या विक्रीची माहिती अमळनेर पोलिसांना मिळताच पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलं. तिच्याकडे चौकशी केली असता महिलेने सांगितलेली कहाणी ऐकून पोलिसही हळहळले. पोलिसांनी त्या व्यक्तीकडून बाळ परत घेतलं आणि त्या बाळासह इतर सहा भावंडांना बाल कल्याण समितीच्या स्वाधीन केलं.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84