दि. 04 जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंडखोरी
करून मुख्यमंत्रिपद पटकावले. आता विधानसभेच्या विशेष अधिवेशनामध्ये एकनाथ शिंदे
यांनी बहुमत सिद्ध केले
आहे. शिंदे सरकारने बहुमताचा 144
चा आकडा पूर्ण केला आहे. त्यामुळे आता शिंदे आणि फडणवीस सरकारवर
शिक्कामोर्तब झाले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात 10 दिवसांच्या बंडखोरीनंतर मोठा बदल घडवणारे शिवसेनेचे नेते आणि
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नव्या सरकारने अखेरीस बहुमताची चाचणी पास केली
आहे. शिंदे सरकारच्या बाजूने शिवसेना बंडखोर आणि भाजपच्या आमदारांनी मतदान केलं.
सरकारने 144 बहुमताचा
आकडा पार केला आहे. शिंदे सरकारला एकूण 164 मतं मिळाली आहे. तर महाविकास आघाडीला फक्त 99 मतं मिळाली. तर 3 आमदार हे तटस्थ राहिले
होते. यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे पाच मोठे नेते बहुमत चाचणीला गैरहजर
असल्याचे समोर आले. विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण, संग्राम
जगताप यांना सभागृहामध्ये येता आले आहे. सभागृहाची दार बंद झाल्यामुळे पाच
नेत्यांना येता आले नाही. त्यामुळे हे पाचही नेते मतदानाला मुकले. तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बहुमताची
आकडेवारी मोजून दाखवली आणि सर्वात जास्त मतदान हे शिंदे सरकारच्या बाजूने असल्याचे
जाहीर केले. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी एकच घोषणाबाजी केली.
दरम्यान, बहुमत चाचणीच्या आधीच शिवसेनेला धक्का बसला. संतोष
बांगर हे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान शिवसेनेसोबत होते. शिवसेनेच्या
सुनील प्रभू यांचा व्हीप मानत संतोष बांगर यांनी काल शिवसेनेच्या बाजून मतदान
सुद्धा केलं होतं. मात्र आज ते शिंदे गटात सामील झाले. संतोष बांगर यांना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पाहून अनेकांच्या भुवया उंचवल्या. त्यानंतर
संतोष बांगर हे शिंदे गटातील आमदारांसोबत बस मधून विधानभवनात रवाना झाले होते.
संतोष बांगर यांच्या बंडखोरीमुळे आता शिंदे गटातील शिवसेनेच्या आमदारांची संख्या
आता 40 वर पोहोचली आहे. तर शिवसेने सोबतच्या आमदारांची
संख्या आता 15 वर आली आहे. संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदे गटाला
मतदान केले आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील
समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा
! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर
फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर
फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84