पुणे, दि.२७ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): चिखलातील रस्त्याने एका 8 वर्षीय मुलाचा जीव घेतल्याची घटना संभाजीनगर जिल्ह्यात घडलीये. पोटात दुखत असल्याने उपचारासाठी वडील मोटार सायकलवरून दवाखान्यात नेत असताना बाईक रस्त्यामध्ये झालेल्या चिखलात फसली आणि दवाखान्यात जाण्यापूर्वीच मुलाचा मृत्यू झाला. कृष्णा बाबुलाल परदेशी असं या चिमुरड्याचं नाव आहे.
संभाजीनगर जिल्ह्यातील
गंगापूर तालुक्यातील लखमापूरमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ
व्यक्त करण्यात येत आहे.
सत्ता संघर्षामध्ये मविआ
सरकारने जाता जाता औरंगाबादचे संभाजीनगर असं नामकरण केलं. त्यानंतर सत्तेवर
आलेल्या शिंदे आणि भाजप सरकारनेही आधीच्या सरकारच्या निर्णयाला स्थगिती देऊन
छत्रपती संभाजीनगर असं नामकरण केले. या मोठ्या शहराचं नामकरण झालं असलं तरी
शहरवासियांच्या समस्या तशाच आहे.
लखिंपुरमध्ये राहणाऱ्या 8 वर्षीय कृष्णा परदेशी याच्या पोटात दुखू
लागल्याने त्याचे वडील बाबूलाल परदेशी त्याला दुचाकीवरून गंगापूरला घेऊन जात होतं.
मात्र, जाताना खराब रस्त्यावर चिखल झाल्यामुळे दुचाकी त्यात
फसली. काही केल्या चिखलातून बाईक निघत नव्हती. वेळेवर उपचार न मिळाल्याने
दुर्दैवाने चिमुरड्याने त्यांच्या डोळ्यासमोर प्राण सोडले. या घटनेनंतर संपूर्ण
गावात यंत्रणा राजकीय नेते यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जातोय.
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84