पुणे, दि.१६ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): राज्यभरात सध्या पावसाने अक्षरश:
धुमाकूळ घातला आहे. जितके तिकडे पाणीच पाणी साठलं आहे. राज्यातील बहुतांशी
जिल्ह्यांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कारणाशिवाय घराबाहेर
पडू नका असा सल्ला वारंवार दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर एक व्हिडीओ सध्या सोशल
मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये २ लहान मुलं समुद्राच्या लाटेत वाहून जाताना
दिसत आहेत. त्या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. दरम्यान एक व्यक्ती
पाण्यात उडी मारतो, पण लाट त्या व्यक्तीला देखील
सोबत घेऊन जाते. या धक्कादायक व्हिडीओमध्ये वाहून गेलेल्या मुलांची ओळख पटली आहे. ही
मुलं सांगलीची होती. त्यांच्यासोबत वाहून गेलेला व्यक्ती त्यांचे वडील होते. त्या
एका चुकीमुळे होत्याचं नव्हतं झालं.
हा प्रकार मुंबईतील आक्सा बीचवर घडला
अशी चर्चा होती. परंतु खरं तर ही घटना ओमान या देशात घडली आहे. या ठिकाणी
संध्याकाळी वडील आपल्या दोन मुलांना घेऊन समुद्रावर फिरायला गेले होते. समुद्रातील
फेसाळणाऱ्या लाटा पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. याच दरम्यान एक मोठी
लाट येते आणि सोबत दोन चिमुरड्या मुलांना घेऊन जाते. त्यांना वाचवण्यासाठी वडील
पाण्यात उडी मारतात खरे पण त्यांचा जीव देखील जातो.
मिळालेल्या वृत्तानुसार वाहून गेलेल्या व्यक्तीचं नाव शशिकांत म्हमाणे असं होतं. त्यांची नऊ वर्षाची मुलगी श्रुती व सहा वर्षाचा मुलगा श्रेयस हे समुद्राच्या लाटेत वाहून गेले आहेत. यापैकी मुलाचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही. पिता व मुलीचा मृतदेह बुधवारी मिळाले. लक्षवेधी बाब म्हणजे हे कुटुंब सांगलीतील जत तालुक्यामधील होतं. समुद्राच्या लाटा पाहण्यासाठी ते प्रमाणापेक्षा पुढे गेले अन् होत्याचं नव्हतं झालं.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल
मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84