पुणे, दि.२७ जुलै २०२२ (चेकमेट
टाईम्स): पुणे शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून कात्रज, सोलापूर रस्ता परिसरात वेगवेगळ्या घटनेत तिघांना लुटण्यात
आल्याची घटना घडली.
कात्रज
भागातील सावंत विहार सोसायटी परिसरातून जात असलेल्या पादचारी महिलेच्या हातातील ७०
हजारांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत एका
महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक अतुल
थोरात तपास करत आहेत.
हडपसर
भागात एका प्रवाशाला मोटारचालकाने लुटल्याची घटना घडली. याबाबत नवनाथ झाडे (वय ३४, रा. ओंकार काॅलनी, थेरगाव, पिंपरी-चिंचवड) यांनी या संदर्भात हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद
दिली आहे. झाडे बाहेरगावी निघाले होते. सोलापूर रस्त्यावर हडपसर भागात ते बसची वाट
पाहत थांबले होते. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास एक मोटारचालक तेथे आले. कोठे
निघाला, अशी विचारणा मोटारचालकाने केली.
त्यानंतर चोरट्याने त्यांना मोटारीतून मूळगावी सोडण्याची बतावणी केली. चोरट्याने
त्यांना मोटारीत धमकावले. त्यांना चाकूचा धाक दाखविला. झाडे यांच्याकडील रोकड, दोन मोबइल तसेच महत्त्वाची कागदपत्रे असा ५६ हजार रुपयांचा ऐवज
मोटारचालकाने लुटला. झाडे यांना पुणे-सोलापूर रस्त्यावर यवत परिसरात सोडून चोरटा
पसार झाला. सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे तपास करत आहेत.
हडपसरमधील मांजरी भागात एका पादचारी तरुणाचा मोबाइल
संच चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत सुहास जाधव (वय २५, रा. शेवाळवाडी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
जाधव रात्री मांजरीतील ग्रीन सोसायटी परिसरातून जात होते. त्या वेळी चोरट्यांनी
जाधव यांच्या हातातील आठ हजार रुपयांचा मोबाइल संच हिसकावून नेला. सहायक पोलीस
निरीक्षक एम. जी. थोरात तपास करत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84