Type Here to Get Search Results !

मेट्रोच्या कामामुळे गुरुवारी व शुक्रवारी पुण्यात मध्यरात्रीपासुन हा रस्ता बंद

 


पुणेदि.२७ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): महात्मा फुले मंडई परिसरात सुरु असलेल्या मेट्रो कामामुळे गुरुवारी (ता. २८) व शुक्रवारी (ता. २९) मध्यरात्री एक ते पहाटे पाच वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील समाधान चौकापासून ते स्वारगेटपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन विश्रामबाग वाहतुक विभागातर्फे करण्यात आली आहे.

महात्मा फुले मंडई येथे आमराळे रस्ता, गोटीराम भैय्या चौक, झुणका भाकर केंद्र व त्यालगतच्या भागामध्ये मेट्रोच्यावतीने मंडई मेट्रो स्टेशनचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील समाधान चौक ते स्वारगेटपर्यंत शुक्रवारी व शनिवारी मध्यरात्री एक वाजल्यापासून ते पहाटे पाच वाजेपर्यंत वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्यात येणार आहे. संबंधित वाहने रामेश्‍वर चौकाकडून उजवीकडे वळून इच्छितस्थळी जातील. तरी वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतुक पोलिसांनी केले आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.