Type Here to Get Search Results !

आज वारजेकरांच्या या महत्वाच्या आरोग्य समस्यांचे झाले निराकरण; किरण बारटक्के यांनी केले होते आयोजन

 


पुणेदि.२२ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वारजे माळवाडी येथे आरोग्य सेवा देण्याच्या संकल्पातुन पुण्यातील जोशी हॉस्पिटल आणि रत्ना हॉस्पिटल यांच्या सहकार्यातून, माजी नगरसेवक किरण बारटक्के यांच्या माध्यमातून आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या सेवाकार्यात मोफत कॅन्सर तपासणी, पाईल्स, फिशर, हर्निया, मुळव्याध तपासणी तसेच नेत्र तपासणी, मोतीबिंदु तपासणी शस्त्रक्रिया शिबीर, मोफत चष्मे वाटप इत्यादी तपासण्यांचा समावेश करण्यात आला होता.

सदर सेवा शिबिरात नागरीकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला व तपासण्या करुन घेतल्या. या शिबिराचा किमान सातशे नागरिकांनी लाभ घेतल्याचे आयोजक किरण बारटक्के यांनी चेकमेट टाईम्सशी बोलताना सांगितले. या लोकोपयोगी शिबिराचे उदघाटन परिसरातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले होते तर खडकवासला विधानसभा मतदार संघाचे आमदार भिमराव तापकीर, ह.भ.प नारायण महाराज गोरे, जेष्ठ पत्रकार राजेश नाना काटे, वर्धमान जैन श्रावक संघाचे अध्यक्ष पारस छाजेड, सचिन मोरे, सुधाकर मोडक, विवेक छावजी, कुंडलिक सोनवणे, दिनेश लुणावत, सुरेश शिगवण, बाप्पु माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अशोक ऊनकुले यांनी, तर धनंजय बांद्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.