Type Here to Get Search Results !

खणीकर्मामुळे नाशिकच्या त्रंबकेश्वराला मोठा धोका, नागरिकांचा जीव धोक्यात?



पुणे,दि.२८ जुलै (चेकमेट टाईम्स) : नाशिकच्या त्रंबकेश्वराला आता ब्रह्मगिरीचाच धोका असल्याचं समोर येत आहे. कारण, इथे डोंगरांना अचानक पडणाऱ्या भल्या मोठ्या भेगांमुळे इथले लोक जीव मुठीत घेऊन जगत आहेत.

माळीन आणि तळये येथील भूस्खलनाच्या जखमा ताज्या असताना आता नाशिकच्या त्र्यंबकेश्र्वर ब्रम्हागिरी पर्वतरांगाजवळ भूस्खलन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, ही घटना थोडक्यात असल्याने प्रशासना समोर वेळीच सावध होण्याची वेळ आहे. या घटनेकडे दुर्लक्ष केल्यास या घटनेचं दुर्गटनेत रुपांतर व्हायला वेळ लागणार नाही.

सह्याद्रीच्या पर्वतरांगांपैकी ब्रह्मगिरीच्या काळ्या पाषाणातील या पर्वतरांगा. पण आता याच कनखर पर्वतरांगा ढासळू लागल्याने त्र्यंबकेश्वर शहराला धोका निर्माण झाला आहे.

गेल्या पंधरवड्यात नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसानंतर ब्रह्मगिरी पर्वत रांगावर असलेल्या जामाची वाडी, मेटघर किल्ला परिसरात मोठ्या प्रमाणत भुस्खलन झाल्याने या वाड्या वस्त्यांना आणि त्र्यंबकेश्वर शहरालाच धोका निर्माण झाला आहे. अचानक झालेल्या या भूस्खलनाने या मेटघर परिसरातील नागरिक भीतीच्या सावटखाली रात्री काढतात.ब्रह्मगिरीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या वाड्यावस्त्यांमधील हे रहिवाशी आपला जीव मुठीत ठेवून जगत आहेत. कारण या डोंगरांना कधी नव्हे असे मोठ-मोठे तडे जात आहेत.

रात्री-अपरात्री अचानक भला मोठा आवाज होतो आणि जमीन थोडी तिडकी नाही तर ५०-५० फुटाने खाली खचते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या भूस्खलनाने त्र्यंबकेश्वर शहराच्या दिशेने असलेला डोंगर तब्बल ४० ते ५० फुटांनी खाली धसल्याने त्र्यंबकेश्वर नगरीलाही धोका निर्माण झाला आहेब्रह्मगिरीच्या पर्वतरांगांवर झालेली बेसुमार वृक्षतोड, भुमाफियांकडून रिसॉर्ट बांधणी साठी करण्यात येणारी सपाटी आजूबाजूला असलेले खडीक्रशर या सगळ्यासाठी सर्रासपणे केले जाणारे जिलेटिनचे स्फोट हेच या भूस्खलनाचे कारण आहे. या वारंवार होणाऱ्या स्फोटामुळे ब्रम्हगिरीच्या पर्वतरांगा कमकुवत झाल्या आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याने आता त्या खचू लागल्या आहे. खरे कारण शोधून कारवाई करण्याची गरज आहे. अन्यथा माळीन आणि तळयेची पूनरावृती अटळ आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.