पुणे, दि.२२ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): राजीव गांधी प्राणीसंग्रहलायाच्या पार्किंगमध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणांत लूट होत आहे. राज्यभरातून प्राणी पाहण्यासाठी पर्यटक येत असताना ठेकेदाराच्या दादागिरीला सामोरे जावे लागत आहे. चारचाकीसाठी तासाला दहा रुपये शुल्क असताना तब्बल ३० रुपये वसूल केले जात आहेत. तर दुचाकीला २ रुपयांऐवजी १० रुपये शुल्क आकारले जाते. या ठेकेदारांविरोधात महापालिकेकडे तक्रार करुनही किरकोळ दंडात्मक कारवाईशिवाय काहीही करण्यात आलेले नाही. त्यामुळे या ठेकेदाराला पैसे उकळण्यासाठी मोकळे रान मिळाले आहे.
कोरोनानंतर मार्चमध्ये प्राणी संग्रहालय चालू झाल्यापासून
साडेसात लाखांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली आहे. या माध्यमांतून महापालिकेला अडीच
कोटी रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे. वाघ, सिंह,
हत्ती, रानमांजर, वाघाटी,
शेकरु, अस्वल, गवा
यांच्यासह वेगवेगळ्या प्रजातीचे साप आणि अन्य वन्यजीव प्राणी संग्रहालयात पाहायला
मिळतात. यासाठी राज्यासह देश-परदेशातून पर्यटक येतात. या पर्यटकांसाठी महापालिकेने
राजीव गांधी वाहनतळाची सोय केलेली आहे. हे वाहनतळ खाजगी ठेकेदारांकडून चालविले जात
आहे. महापालिकेने ठेकेदारांसोबत केलेल्या करारामध्ये दुचाकीसाठी तासाला दोन रुपये आणि
चारचाकीसाठी दहा रुपये दर निश्चित केलेला आहे. एवढेच पैसे ठेकेदाराने घेणे
बंधनकारक आहे. परंतु, ठेकेदाराच्या कामावर महापालिका
अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याने लुटमार सुरु असल्याचे दिसून येते.
प्राणीसंग्रहलालयात आलेल्या पर्यटकांकडून वाहनांसाठी शुल्क
म्हणून तिप्पट वसुली करण्यात येते. त्यामुळे पर्यटकांना अधिकचा अर्थिक भुर्दंड
होतो. दुचाकी पार्किंग केल्यास पहिल्या तासाप्रमाणे २ रुपये आकारणी करणे गरजेचे
असताना थेट पाच तासाचे म्हणून १० रुपये आकारले जातात. तर, चारचाकीसाठी एक तासाच्या नंतर पाच-दहा
मिनीट झाले तरी जास्तीचे ३० रुपये आकारले जात असल्याचे समोर आले आहे. चारचाकी
वाहनांसाठी वाहनचालकांना कोणत्याही प्रकारची पावती देण्यात येत नाही. एखाद्या
पर्यटकांने ती आवर्जून मागीतलीच तर तिच्यावर शुल्काची रक्कम न टाकता तारीख आणि वेळ
नमूद असलेली पावती दिली जाते.
महापालिकेसोबत केलेल्या करारात पार्किंगच्या ठिकाणी मोठ्या
अक्षरात दरपत्रक लावणे बंधनकारक आहे. तसेच, तक्रारीसाठी
क्रमांक लिहणे आवश्यक आहे. पंरतु पार्किंगच्या जागेत कुठेही दरपत्रक किंवा तक्रार
क्रमांक दिलेला नाही. नागरिकांना शुल्कांबाबत विचारणा करताच ठेकेदाराच्या
माणसांकडून दादागिरी करत उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे कुटुंबासमवेत
आलेले पर्यटक नाईलाजास्तव निमूटपणे निघून जातात, असा वारंवार
अनुभव येत आहे.पार्किंगच्या ठेकेदाराने नियमांनुसार शुल्क आकारणे बंधनकारक आहे.
सद्यस्थितीत या घटनास्थळी जाऊन पाहणी करण्यात येईल. सर्व बाबी तपासून ठेकेदारावर
कडक कारवाई करण्यात येईल.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७
या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84