Type Here to Get Search Results !

धानोरी, सिंहगड रोड येथे नवीन दोन अग्निशामक केंद्रे कार्यान्वित

 


पुणेदि. जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): सिंहगड रस्ता येथील लोकमत कार्यालयाशेजारी नव्याने बांधण्यात आलेले कै.दत्तात्रय नवले अग्निशमन केंद्र आजपासून सेवेसाठी कार्यान्वयीत करण्यात आले असून येथे अग्निशामक दलाचे एक वाहन २५ कर्मचारी कार्यारत असणार आहेत. त्यामध्ये तीन शिफ्टनुसार तीन वाहन चालक, प्रत्येक शिफ्टसाठी सात जवान व एक केंद्रप्रमुख अधिकारी म्हणून प्रकाश गोरे कार्यरत असणार आहेत. वडगाव बुद्रुक ते खडकवासला या क्षेत्रासाठी केंद्र कार्यान्वित असणार आहे.

सध्या केंद्राचे बांधकाम पूर्ण झालेले नाही, मात्र पीएमआरडीए अग्निशामक केंद्रावरील वाढता ताण व घटनास्थळी जाण्यासाठी होणारा उशीर बघता तूर्तास एक गाडी व उपलब्ध जवान असे काम सुरु केले जाणार आहे. येत्या दिवाळीपर्यंत केंद्राचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर केंद्र पूर्णपणे सुरु होणे अपेक्षित आहे. त्यावेळी मात्र तीन गाड्या व तसेच ५० जवान केंद्रावर उपस्थित असणे अपेक्षित आहे, अशी माहिती नवले अग्निशामक केंद्र प्रमुख प्रकाश गोरे यांनी दिली.

तर दुसरीकडे धानोरी येथे कर्मयोगी कै. महादु सखाराम टिंगरे अग्निशामक केंद्रही आजपासून कार्यान्वित झाले.याकेंद्रावरही एक गाडी २६ कर्मचारी कार्यरत असणार आहेत. येरवाडा केंद्रावरील ताण कमी करण्यासाठी हे केंद्र सुरु केले आहे.यामध्ये धानोरी, लोहगाव, टिंगरेवस्ती व विश्रांतवाडीचा काही भाग या परिसराचा समावेश असणार आहे.

तुर्तास सध्याचे जवान व उपलब्ध गाडी हे या परिसरासाठी पुरेसे आहेत. मात्र, वाढता व्याप पाहिला, तर लोहगावची वाढती लोकवस्ती पाहता तेथेही उपकेंद्र होणे गरजेचे आहे, अशी माहिती टिंगरे अग्निशामक केंद्राचे केंद्रप्रमुख सोपान पवार यांनी दिली.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.