Type Here to Get Search Results !

सिंहगड रस्त्यावर डंपरचे चाक अंगावरुन गेल्याने शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू

 


पुणे दि.२९ जुलै (चेकमेट टाईम्स): पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात कॉलेजमध्ये निघालेल्या महिला प्राध्यापिकेच्या अंगावरुन डंपरचे चाक गेल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 29) सकाळी नऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी डंपर चालकाविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृषाली तुषार थिटे (वय – 38 रा. वडगाव बुद्रुक, पुणे) असे मृत्यू झालेल्या महिला प्राध्यापिकेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृषाली थिटे या नऱ्हे येथील झील कॉलेजमध्ये प्राध्यापक होत्या. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे दुचाकीवरुन कॉलेजमध्ये जात होत्या. वडगाव बुद्रुक येथील कॅनॉल लगतच्या शिंदे मैदानाजवळ आले असताना भरधाव वेगात आलेल्या डंपरची धडक त्यांच्या दुचाकीला बसली. यामध्ये थिटे या खाली पडल्या. त्यांच्या अंगावरुन डंपरचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, सहायक पोलीस निरीक्षक राहुल यादव, पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड, वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कणसे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत वृषाली थिटे यांना जवळच्या एका खासगी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. अपघातानंतर चालक डंपर सोडून पळून गेला आहे. पोलीस चालकाचा शोध घेत आहेत.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.