पुणे, दि.२५ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): वारजे, एनडीए रस्ता परिसरात दहशत माजविणारा गुंड गणेश उर्फ शिऱ्या
वाघमारे याच्यासह साथीदारांच्या विरोधात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यावन्ये (मोक्का) कारवाई करण्याचे
आदेश दिले.
गणेश उर्फ शिऱ्या वाघमारे (वय २१), सचिन शंकर दळवी (वय २३), सुरज राजू मारूडा
(वय २१), रखमाजी परमेश्वर जाधव (वय १९), प्रतीक संजय नलावडे (वय २१). समीर नरहरी कांबळे (वय १८) अशी मोक्का कारवाई
केलेल्या गुंडांची नावे आहेत. वाघमारे आणि साथीदारांनी वारजे, उत्तमनगर भागात दहशत माजविली होती. या टोळीच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, लूट असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
प्रतिबंधक कारवाई केल्यानंतर वाघमारे आणि
साथीदारांच्या वर्तणुकीत बदल झालेला नव्हता. उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ
निरीक्षक सुनील जैतापूरकर यांनी वाघमारे आणि साथीदारांच्या विरोधात मोक्का कारवाई
करण्याचा प्रस्ताव परिमंडळ तीनच्या उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्याकडे सादर
केला. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी वाघमारे आणि साथीदारांच्या विरोधात मोक्का कारवाई
करण्याचा प्रस्तावास मंजुरी दिली.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल
मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84