पुणे, दि.१६ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स):
सिंहगड
रस्त्यावरील नांदेड फाटा परिसरात सर्व्हे नं २५ येथे पाच ते सहा अज्ञात गुंडांकडून
सात ते आठ चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही
घटना घडली असून याबाबत हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
आहे. गुन्हेगारांच्या वर्चस्व वादातून या परिसरात सतत घडणाऱ्या अशा घटनांमुळे
सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नांदेड गावच्या हद्दीतील सर्व्हे नं.२५ हा परिसर मागील काही वर्षांपासून
गुन्हेगारांचा अड्डा बनला आहे. खुन,खुनाचा प्रयत्न,
मारहाण, शस्त्रांचा धाक दाखवून दहशत पसरवणे,
व्यावसायिकांकडे खंडणी मागणे, व्यावसायिकांना
धमकावणे असे अनेक गुन्हे या भागात घडले आहेत. अल्पवयीन तरुणांसह पंचवीस ते तीस
वयाच्या आतील गुन्हेगारांच्या काही टोळ्या या भागात निर्माण झालेल्या आहेत.
त्यांच्यातील वर्चस्व वादातून सातत्याने आपापसांतील सहकाऱ्याचा खुन, खुनाचा प्रयत्न असे गंभीर प्रकार सुरू असतात मात्र याचा त्रास परिसरातील
सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण
झाले आहे.
दि. १४ जुलै रोजी या गुन्हेगारांमध्ये भांडण झाले होते. त्या भांडणाचा या वाहनांच्या तोडफोडीशी काही संबंध आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत. अशा घटना वारंवार घडत असल्याने पोलीसांच्या कारवाईबाबत स्थानिक नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधील भीती दूर करण्यासाठी पोलीसांनी अशा समाज कंटकांकवर कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. "पोलीसांचे एक पथक रवाना झाले आहे. संशयतींची माहीती मिळाली आहे, लवकरच त्यांना पकडण्यात येईल. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. इतरही नागरिकांनी न घाबरता तक्रार देण्यासाठी पुढे यावे." निरंजन रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84