पुणे दि. १२ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स) : - पावसाला सुरुवात
होताच रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साठून अपघाताच्या घटना घडत आहेत. तर, मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील डांबर वाहून रस्त्यांत खड्डेही पडत आहेत. ठाणे
जिल्ह्यातील खड्ड्यांचा प्रश्नही चांगलाच समोर आला. ठाण्याचे नेते आणि बंडखोर
शिवसेना नेते एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ठाण्याच्या
रस्त्यांवरील खड्डे आणि वाहतूक कोंडीच्या समस्यांकडे लक्ष वेधले आहे. तर, दुसरीकडे ठाण्यातील खड्ड्यांवरुन जनतेत तीव्र नाराजी आहे. आता, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या कल्याणमधील एका बस ड्रायव्हरचा
व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
भिवंडीतून कल्याणला जात असलेल्या बस ड्रायव्हरने बस चालवताना हा व्हिडिओ
रेकॉर्ड केला आहे. त्यामध्ये, रस्त्यावरील
खड्ड्यांमुळे बस चालवताना होणारी कसरत आणि त्रास त्याने आपल्या शब्दात मुख्यमंत्र्यांना
सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या, हा व्हिडिओ सोशल
मीडियावर चांगलाच व्हायरल झाल्याचं दिसून येत आहे.
अहो मुख्यमंत्रीसाहेब, शिंदेसाहेब. आता, बघा हे कल्याणचे खड्डे. भिवंडी अख्खी खड्यातय वो साहेब. तुम्ही भिंवडीला
बघा, काहीतरी करा. विचार चालला होता पंढरपूरला जायचा, पण मी अजून इथंचंय. साहेब थोडीशी आमच्यावर दया करा आणि हे खड्डे बुजवा ओ
इकडचे. लोकांना या खड्ड्यांचा भरपूर त्रास होतोय. मी बस चालवतोय म्हणून मला कळतंय
हे खड्डे काय आहेत. एक विचार करा, या खड्ड्यांमुळे किती
लोकांना त्रास होतो. तुम्ही नवीन मुख्यमंत्री झालाय,
आता भिवंडीला
तुमच्या हातात घ्या. ही भिवंडी तुमचं नाव काढेल,
एवढचं माझं
म्हणणंय, अशी कळकळीची विनंती बस ड्रायव्हरने व्हिडिओच्या
माध्यमातून केली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
viral झालेला तो व्हिडीओ पुढीलप्रमाणे,
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर
उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत
असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू
शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84