दि. 01 जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): यंदा जून संपला तरी पाऊस पडलाच नाही आणि पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण साखळीत पाणीसाठा कमी झाल्याने अखेर पुणे महापालिकेने पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे शहरात सोमवारपासून (4 जुलै) एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. प्रशासनाकडून लवकरच या पाणी कपातीचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाल्याने पाण्याचा वापर जपून करावा असं पत्रच जलसंपदा विभागाने महापालिका प्रशासनाला पाठवले होते. सध्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणात मिळून केवळ अडीच टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाऊस आणखी लांबला तर परिस्थिती आणखी चिंताजनक होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे शहरातील काही भागात सध्या पाण्याची टंचाई आहे. तर अनेक
भागात अनियमित स्वरूपात पाणीपुरवठा केला जातो. तर काही भागात दिवसभरातून फक्त एकच
वेळ पाणी येत असते. अशा परिस्थितीत या भागात पाणी कपात केली तर परिसरातील
नागरिकांना पाणीच मिळणार नाही हे यापूर्वी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पाणी कपातीचा
निर्णय झाला तर एक वेळ मिळणारे पाणीही पूर्ण दाबाने मिळावे अशी मागणी होत आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल
मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील
समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा
! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर
फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर
फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes