पुणे दि १३ जुलै (चेकमेट टाईम्स): फुरसुंगी परिसरातील परिस्थिती आता येथील नागरिकांनी फ्लेक्सद्वारे प्रशासनांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. गेले बारा दिवस झाले पिण्याचे पाणी येत नाही जे पाणी येते ते गढूळ काळे पाणी येत आहे. त्याला वैतागून येथील नागरिकांनी कर भरमसाठ भरून... काय ते पाणी... अशा प्रकारचे फ्लेक्स लावून प्रशासनाचा निषेध केला आहे.
फुरसुंगी गाव महापालिकेत समाविष्ट करण्यात आले. मात्र
महापालिकेकडून मिळणाऱ्या सुविधा अपुऱ्या मिळत आहेत. मुख्य म्हणजे पाणी येथे
पूर्वीपासूनच कचरा डेपोमुळे टँकरने पुरवले जात होते. मात्र त्याची संख्या ही कमी
झाली आहे. तर काही भागात येतील विहिरीमधील नळ कोंडाळ्याव्दारे पाणीपुरवठा होतो. पण
त्या पाण्यातही कालव्याला पाणी आल्यावरच होतो.
कालव्याच्या विसर्गमुळे येथील नागरिकांना पाणीपुरवठा होत
असतो. मात्र कालव्यात पाणी नसले की या परिसराला पाणी मिळत नाही आणि सध्या जे १२
दिवसांनी पाणी येते तेही काळे पाणी येत असल्याने अजिंक्य ढमाळ, सचिन हरपळे, अमोल कापरे यांनी
फ्लेक्स लावून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. याबाबत सासवड रस्त्यावर फलक लावून
आम्हाला शुद्ध पाणी मिळेल का, याची अपेक्षा
त्यांनी व्यक्त केली आहे.
वरील वृत्त खाली
लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत
आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि
उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला
खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84