दि. 01 जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): महिला डॉक्टरकडून दोन लाखांची लाच स्वीकारताना सिंधुदुर्ग येथील महिला पोलीस अधिकाऱ्याला एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. नलीनी शंकर शिंदे असे एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. सोनोग्राफी सेंटर सील न करण्यासाठी आणि तपासात सहकार्य करण्यासाठी नलीनी यांनी पाच लाखांची मागणी केली होती. ही कारवाई निगडी परिसरात करण्यात आली आहे.
मिळालेल्या
माहितीनुसार, बाल लैंगिक
अत्याचारासबंधी तपासासाठी आलेल्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
अकडल्या आहेत. याबाबत जेष्ठ महिला डॉक्टरने पुण्याच्या एसीबीकडे तक्रार केली होती.
नलीनी शंकर शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेमणूक महिला अत्याचार निवारण कक्ष
सिंधुदुर्ग असे महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. नलीनी या मालवण पोलीस ठाण्यात
दाखल असलेल्या बाल लैंगिक अत्याचार गुन्ह्याच्या तपासाठी निगडीत आल्या होत्या.
त्यांनी जेष्ठ महिला डॉक्टरकडे सोनोग्राफी सेंटर आणि तपासात सहकार्य करते असे
म्हणून ५ लाखांची लाच मागितली, तडजोडअंती २ लाख घ्यायचे ठरले, ते पैसे घेताना एसीबीने पोलीस
अधिकारी नलीनी यांना रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणी निगडी पोलिसात गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल
मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील
समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा
! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर
फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर
फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर
फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84