पुणे, दि.२६ जुलै २०२२ (चेकमेट
टाईम्स): कोथरुडमधील केळेवाडी, किष्किंधानगर, सुतारदरा, जयभवानीनगर आदी भागात राहणा-या असंख्य महिलांनी फंडात गुंतवलेले पैसे परत
न करता ३६ लाखाहून अधिक रकमेची फसवणूक करण्याचा प्रकार कोथरुडमध्ये घडला. या
प्रकरणात न्याय मिळवून द्यावा, आमचे पैसे परत मिळावेत यासाठी
सहकार्य करावे, अशी मागणी महिलांनी कोथरुड पोलिसांकडे केली
आहे.
संबंधित महिले विषयी २४ नोव्हेंबर २०२१ रोजी
विमल कोंडीबा यादव, रा. हनुमाननगर, केळेवाडी यांनी व एकतीस जणांनी कोथरुड पोलिसात तक्रार दिली होती.
पोलिसांनी या महिलेला चौकशीसाठी बोलावल्यावर पैसे देण्याचे आश्वासन या महिलेने
दिले. त्यामुळे तीच्यावर कोणताही गुन्हा नोंदवण्यात आला नाही असे यादव यांनी
सांगितले. विमल यादव म्हणाल्या की, मनिषा खंडू मारणे या १५
वर्षे फंड चालवत होत्या. त्या ओळखीच्या असल्यामुळे मी त्यांनी सुरु केलेल्या फंडात
पैसे गुंतवायला सुरुवात केली. महिना ३ टक्के याप्रमाणे ३६ टक्के व्याज दराने पैसे
मिळतील असे सांगितले होते. काही जणांना तसे पैसे मिळाल्याची उदाहरणे पाहिली
असल्याने मी २०१७ पासून पैसे गुंतवायला सुरुवात केली. आता ही महिला गायब झाली आहे.
आजपर्यंत मला तीच्याकडून एक रुपयासुध्दा परतावा मिळाला नाही. माझ्या प्रमाणेच
असंख्य महिलांची फसवणूक झाली आहे. कल्पना घाडगे म्हणाल्या की, आठ वर्षे मी त्यांच्याकडे फंड चालवत होतो. गेले दहा महिने झाले पैसे मागून
आम्ही कंटाळलो आहोत. आता ती फोन उचलत नाही. लता शिंदे म्हणाल्या की, पाच वर्षे झाले मी तीच्याकडे पैसे गुंतवले होते. आम्ही बँकेचे व्यवहार करत
नाही. आम्हाला काही गोष्टी समजत नाही. आणि बँकेतील लोक नीट समजून सांगतही नाही. त्यामुळे
आम्ही अशा खाजगी फंडात आंधळ्या विश्वासाने पैसे गुंतवतो. आता त्याचा पश्चाताप होत
आहे.
कोथरुड पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक
महेंद्र जगताप म्हणाले की, या प्रकरणात फसवणूक झालेल्या
महिलांनी आमच्याकडे रीतसर तक्रार नोंदवावी. या प्रकरणातील दोषींवर कायदेशीर कारवाई
केली जाईल. शिवानी घोगरे म्हणाल्या की, घर घेण्यासाठी मी
थोडे थोडे पैसे साठवत होते. फंडातून सुरुवातील व्यवस्थित पैसे मिळत होते. नंतर
अचानक तीने पैसे देणे शक्य नाही असे सांगितले. आता माझे घराचे स्वप्न अधुरे राहीले
आणि पैसेही परत मिळालेले नाहीत. पोलिसांनी न्याय मिळवून द्यावा.
वरील वृत्त खाली
लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७
या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84