पुणे, दि.१८ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): राज्य महिला आयोगाकडून 'महिला आयोग आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यात १९ ते २१ जुलै दरम्यान जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड येथे आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर स्वत: तक्रारींची सुनावणी घेणार आहेत.
पुणे शहर भागातील तक्रारींची जनसुनावणी १९ जुलै रोजी
जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी ११ वाजता
होणार आहे. पुणे ग्रामीण मधील तक्रारींवर २० जुलै रोजी सकाळी ११ वाजता
जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुनावणी घेण्यात येणार आहे. २१ जुलै रोजी ज्ञानज्योती
सावित्री बाई फुले स्मारक, पिंपरी चिंचवड
महानगरपालिकेजवळ पिंपरी-चिंचवड भागातील तक्रारींची सुनावणी होईल.
महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा
यासाठी 'महिला आयोग
आपल्या दारी' उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये विभाग
स्तरावर महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या
जनसुनावणी वेळी पोलीस प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक उपस्थित राहणार आहेत.
ग्रामीण भागातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार
करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष
उपस्थित राहणे आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणामुळे शक्य होत नाही. त्यांच्यासाठी हा
उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. या अंतर्गत सुनावणी दरम्यान नव्या तक्रारींवर त्याच
ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. त्यामुळे आपली समस्या मांडणाऱ्या महिलांना त्वरित
दिलासा देण्याचे काम राज्य महिला आयोगाकडून होणार आहे.
पुणे जिल्ह्यात होणाऱ्या जनसुनावणीत अधिकाधिक महिलांनी पुढे
येऊन, न घाबरता
आपल्या तक्रारी यावेळी मांडाव्यात, असे आवाहन आयोगाच्या
अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी अंजनी काकडे ( 8788924872)
किंवा शंभूराजे ढवळे (9075838396) यांच्याशी
संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल
मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84