Type Here to Get Search Results !

चिंताजनक! अमरनाथ यात्रेला गेलेले पुण्यातील 14 भाविक संपर्काबाहेर; 36 नागरिक सुखरुप

 


पुणे दि. 0  जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स) : पुण्याच्या आळंदीतून अमरनाथ यात्रेला गेलेले 14 भाविक संपर्काबाहेर आहेत, अशी प्राथमिक माहिती मिळते आहे. या अमरनाथ यात्रेसाठी पुण्यातून दरवर्षी भाविक जातात.

यावर्षी एकून 50 भाविक यात्रेसाठी गेले होते. अपघातानंतर पुण्यातील भाविकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता 50 पैकी 36 भाविकांशीच संपर्क होऊ शकला आहे. मात्र 14 नागरिकांशी अजूनही काहीच संपर्क होऊ शकला नसल्याने चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आणि जिल्हाधिकारी कार्यालय उत्तराखंड प्रशासनाकडून अधिकची माहिती घेत आहेत. अमरनाथ यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवज शहरातून अनेक भाविक अमरनाथ यात्रेला जात असतात. मोठ्या भक्तीने ते यात्रा करतात. मात्र यावर्षी मोठी दुर्घटना घडल्याने अनेक भाविकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

एनडीआरएफचे (NDRF) महासंचालक (DG) अतुल करवाल यांनी माहिती देताना सांगितलं आहे की, या दुर्घटनेत आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही अनेक जण बेपत्ता आहेत. NDRF पथकाकडून बेपत्ता यात्रेकरुंचा शोध सुरु आहे. सुमारे 40 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. सगळ्या पथकाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहे. मात्र तरीही काही जणांचा शोध अजूनही सुरु आहे.

अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाली होती त्यामुळे अचानक आलेल्या पुराच्या तडाख्यात काही लंगर आणि तंबू वाहून गेले होते. या घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले आहेत. पोलीस, एनडीआरएफ आणि एसएफकडून बचावकार्य सुरू आहे. जखमींना उपचारासाठी विमानाने रूग्णालयात हलवण्यात येत आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. महाराष्ट्रातील काही शहरातील नागरिकांचा देखील यात समावेश आहे.

अमरनाथ गुहेच्या सखल भागात शुक्रवारी सांयकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ढगफुटी झाल्याची माहिती मिळाली होती. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि इतर यंत्रणांकडून बचावकार्य सुरू आहे, अशी माहिती पहलगाम संयुक्त पोलीस नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली होती.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.