Type Here to Get Search Results !

कौतुकास्पद; पुण्यातील सात मंडळांचे गणपती बाप्पा एकाच रथात विराजमान होणार

 


पुणेदि. जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): धनकवडीतील सात मंडळांनी ऐतिहासिक पाऊल उचलले असून, गणेश चतुर्थीच्या दिवशी सातही मंडळांचे बाप्पा एकाच रथात बसवून त्यांची पहिल्या दिवशीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यामुळे आर्थिक बजेट मोठ्या प्रमाणावर वाचले आहे. त्या बजेटवर आम्ही गणेशोत्सवात सामाजिक उपक्रम राबविणार आहोत असेही कार्यकर्त्यांनी सांगितले आहे,

धनकवडी भागातील केशव कॉम्प्लेक्स मित्रमंडळ, जय महाराष्ट्र मित्रमंडळ, अखिल नरवीर तानाजीनगर मित्रमंडळ, पंचरत्नेशवर मित्र मंडळ, एकता मित्रमंडळ, अखिल मोहननगर मित्रमंडळ ट्रस्ट, विद्यानगरी मित्रमंडळ या मंडळांनी हा निर्णय घेतला आहे.

गेल्या २ वर्षात कोरोनामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा झाला. यंदा कोरोना आटोक्यात आल्याचे चित्र दिसू लागल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करण्याची परवानगी दिली. त्यामुळे मंडळे तयारीला लागली आहेत. गणेश चतुर्थीच्या दिवशी ही सात मंडळे एकाच रथावर गणरायाची मूर्ती ठेवून मिरवणुकीला सुरुवात करणार आहेत. देशाचा स्वातंत्र्य अमृत महोत्सव या विषयावर आधारित देखावा रथावर करण्यात येणार आहे. तसेच महापुरुषांचे फोटोही रथावर लावण्यात येणार आहेत. पहिल्या दिवशी त्या भागातील हजारो गणेशभक्त पारंपरिक वेशभूषेत या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. तसेच ढोल पथकांच्या वादनाबरोबरच मिरवणुकीला सुरुवात होणार असल्याचे मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

कोरोन काळातही आम्ही अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. आमच्या येथे मंडळे सण, उत्सव, अनेक उपक्रम एकत्र साजरे करतात. त्याप्रमाणेच आम्ही धनकवडीच्या गुलाबनगर भागातील मंडळांनी मिरवणूक एकत्र काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये सहमताने एकत्रित मिरवणूक काढण्याचे ठरवण्यात आल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.