पुणे
दि.१४ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स) : वारजे डुक्कर
खिंड ते वारजे हायवे चौक हायवे रस्त्यालगत असलेल्या दोन्ही बाजूंच्या सर्व्हिस
रोडवर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात लहान मोठ्या
आकाराचे खड्डे पडलेले आहेत. त्याच प्रमाणे काही ठिकाणी पूर्ण रस्त्यावर चर मारलेली
आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, ते खड्डे त्वरित बुजवून घेण्याची
मागणी माजी विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांनी एका निवेदनाद्वारे महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे.
त्याचबरोबर
हायवे रस्त्याला व सर्व्हिस रोडला जे अनाधिकृत पंक्चर केलेले आहेत ते
त्वरित बंद करावे. दोन्ही रस्त्यांवरील खड्यांना त्वरित कायमस्वरूपी बुजावन्याचे काम करावे. सध्या पावसाळा मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने रस्त्यांवर
पडलेल्या खड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीसाठी हे दोन्ही रस्ते नागरिकांना
त्रास दायक ठरत आहे. शाळकरी मुले, महिला व जेष्ठ
नागरिक तसेच कामा निमित्त बाहेर पडणाऱ्या सर्व नागरिकांना या खड्यांमुळे व रोज होत
असलेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे आतोनात हाल होत आहेत. त्याच प्रमाणे काही
ठिकाणी हायवे वरील दुचाकी वाहन चालकांनी अनाधिकृतपने डिव्हाईडर तोडल्याने हायवे आणि सर्व्हिस रोडवरून नागरिक ये जा करत असतात.
त्यामुळे अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत या बाबी धुमाळ यांनी
महामार्ग प्राधिकरणाच्या लक्षात आणून दिल्या आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली
काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि
उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला
खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो
करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर
फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84