पुणे दि. ०३ ऑगस्ट (चेकमेट टाईम्स): २०१९ ते १८ जानेवारी
२०२२ या कालावधीत भोसरी आणि रास्तापेठ पुणे येथे जागेचे कुलमुखत्यारपत्र स्वतःच्या
नावावर करून विक्रीबाबतचे अधिकार स्वतःकडे असल्याचे सांगून ९० लाख रुपयांची फसवणूक
केल्याचा प्रकार घडला आहे.
संजय जनार्दन लांडगे (वय ५४, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि.
३०) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वृंदा
बिल्डर्स डेव्हलपर्सचे प्रोप्रा जयवंत नारायण अतकरे (रा. बावधन खुर्द, ता. मुळशी), युनायटेड चर्च ऑफ नॉर्दन इंडिया ट्रस्ट
असोसिएशनचे सचिव स्टीफन सिंह (रा. उत्तर प्रदेश) यांच्या विरोधात गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात
संगनमत करून युनायटेड चर्च ऑफ नॉर्दन इंडिया ट्रस्टच्या ताब्यातील रास्तापेठ पुणे
येथील एक हेक्टर २५.३३ आर १२ हजार ४३३ चौरस मीटर मिळकत
विकायचे असल्याचे सांगितले. त्याबाबत आरोपींनी फिर्यादी आणि भागीदार रणजित
नरसिंहराव पिसाळ देशमुख, सागर आल्हाट यांच्याशी वेळोवेळी
बोलणी केली. स्टीफन सिंह याने जागेचे कुलमुखत्यारपत्र त्याच्या नावे करून देऊन
त्याचे सर्व अधिकार त्याच्याकडे असल्याचे बनावट प्रमाणपत्र दाखवून फिर्यादी आणि
भागीदारांचा विश्वास संपादन केला. जागेच्या विक्रीबाबत मेमोरँडम ऑफ अंडरस्टॅण्डिंग
करून ९० लाख रुपये स्वीकारून त्याचे करारनामे भीमराव दौलतराव माळवे, अजित प्रभाकर कानडे, नयन शहा, पंकज
शहा यांच्याशी करून फसवणूक केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल
मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84