पुणे दि. ०३ ऑगस्ट (चेकमेट टाईम्स): पुण्यातील
ऐतिहासिक शिव मंदिराजवळ महिलेचा
कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सोमवारी सायंकाळी आढळला. गीता राजेश कुंभार (वय ४६,
रा. ठाकरसी हिल पाण्याच्या
टाकीजवळ, तारकेश्वर
मंदिर पायथा येरवडा) असे मृत महिलेचे नाव आहे. पहिल्याच श्रावणी सोमवारी घडलेल्या
या घटनेमुळे येरवडा परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक
बाळकृष्ण कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तारकेश्वर टेकडी
येथील झुडपामध्ये एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह पडला असल्याची माहिती
पोलीस नियंत्रण कक्षाद्वारे देण्यात आली होती. घटनास्थळी तात्काळ भेट दिली असता
महिला तारकेश्वर टेकडीच्या पायथ्याजवळ असणाऱ्या ठाकरसी हिल पाण्याची टाकी येथील
राहणारी असल्याची माहिती मिळाली.
गीता
कुंभार या मागील काही दिवसांपासून मानसिक दृष्टीने आजारी होत्या. त्यांच्यावर
उपचारदेखील सुरू होते. शनिवारी रात्रीपर्यंत त्या घरात होत्या,
मात्र मध्यरात्री नंतर त्या
घरातून बेपत्ता झाल्या. दोन दिवस कुटुंबीयांनी शोध घेतल्यानंतर सोमवारी दुपारी
येरवडा पोलीस स्टेशन येथे त्या बेपत्ता झाल्याची नोंद केली. दरम्यान,
सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास
त्यांचा मृतदेह पर्णकुटी पायथा येथील झाडीत कुजलेल्या अवस्थेत सापडला. घटनास्थळी
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भेट दिली. श्वान पथकाच्या
मदतीने आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सदर महिलेचा मृतदेह उत्तरीय
तपासणीसाठी ससून रुग्णालयात रवाना करण्यात आला असून शवविच्छेदनानंतरच नेमका प्रकार
समजू शकेल, अशी माहिती
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिली.
तारकेश्वर
मंदिर हा परिसर पांडवकालीन तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. शेजारीच असणारा
ऐतिहासिक ठाकरसी बंगला तसेच शेजारी असणारीव पुणे महापालिकेची ठाकरसी पाण्याची टाकी
असा विस्तृत परिसर या ठिकाणी आहे. संपूर्ण परिसरात सुरक्षेच्या बाबतीत कोणत्याच
प्रकारची काळजी घेतलेली दिसून येत नाही. धार्मिक स्थळ खाजगी बंगला तसेच महापालिका
क्षेत्र या तीनही वेगवेगळ्या महत्त्वाच्या जागांमुळे सदर ठिकाणी सुरक्षितता
महत्त्वाची आहे. परिसरात अनेक अपप्रवृत्तीचे लोक मद्यपानासह गैरप्रकार करत असतात.
पूर्वी देखील अनेक गंभीर स्वरूपाच्या घटना या परिसरात घडलेल्या आहेत. सुरक्षेच्या
बाबतीत कोणत्याच ठोस उपाय योजना न केल्यामुळे असे गंभीर प्रकार वारंवार घडत आहेत.
असे गंभीर दुर्दैवी प्रकार घडू नयेत यासाठी सुरक्षेबाबत कायमस्वरूपी उपाययोजना
करणे आवश्यक आहे, अशी
लोकांची भावना आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल
मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84