Type Here to Get Search Results !

तुमच्या कोणत्याही गाड्यांमध्ये लावा सनरुफ, कमी किंमतीत घ्या फॉर्च्यूनरचा आनंद

 


दि.०४ ऑगस्ट (चेकमेट टाईम्स): भारतातील वाहन बाजारात सध्या सनरूफ असलेल्या कार्सना मोठी मागणी आहे. पण ज्या लोकांनी आधीच कार खरेदी केली आहे त्यांना हे फीचर वापरायला मिळत नाही. मुळात सनरूफ हे फीचर प्रीमियम कार्समध्ये मिळतं. भारतीय बाजारात ८ लाखांच्या आत अशी एकही कार नाही ज्यामध्ये सनरूफ असेल. मात्र भारतात ८ लाखांपेक्षा कमी किंमत असलेल्या लाखो कार्सची दरवर्षी विक्री होते. या कारमध्ये सनरूफसारखं फीचर नसतं. मात्र आता हे फीचर छोट्या आणि किफायतशीर कार्समध्ये देखील मिळू शकतं.

ह्युंदाई कंपनीने अलिकडेच सांगितलं आहे की, त्यांची दर तिसरी कार सनरूफसह येते. बहुतेक कंपन्या केवळ प्रीमियम कार्समध्येच हे फीचर देतात. कंपनीने जरी तुमच्या कारमध्ये हे फीचर दिलं नसलं तरी तुम्ही ते तुमच्या कारमध्ये बसवून घेऊ शकता. Alto, S-Presso, WagonR, Swift, Kwid किंवा कोणत्याही कंपनीची छोटी कार असली तरी तुम्ही या कारमध्ये सनरूफ लावू शकता. यासाठी ३० ते ५० हजार रुपयांचा खर्च हेईल. तसेच तुम्ही जर कंपनीचं सनरूफ घेत असाल तर त्याची किंमत ८० ते ९० हजार रुपये इतकी असू शकते.


कोणत्याही कारमध्ये सनरूफ बसवण्यापूर्वी कारचं आणि रूफचं मोजमाप केलं जाते. म्हणजेच सनरूफ कुठे बसवायचं आहे. त्यानंतर सनरूफचं मार्किंग केलं जाते. यानंतर कारच्या आतील रूफचा भाग वेगळा केला जातो. हा भाग आणि छताचा पत्रा सनरूफच्या आकारात कापला जातो. त्यानंतर कापलेल्या शीटभोवती सनरूफ फिक्स केलं जातं. तुम्ही जर इलेक्ट्रिक सनरूफ बसवून घेतलं तर ते बटणाच्या सहाय्याने उघडता येईल किंवा बंद करता येईल. सनरूफची ग्रिप चांगली आणि घट्ट असली पाहिजे. ही ग्रिप पाणी आत येण्यापासून रोखते.

देशातील अनेक शहरांमध्ये असे डीलर्स, कार्स शोरूम किंवा गॅरेज आहेत जिथे सनरूफ इन्स्टॉल करून दिलं जातं. दिल्लीत अनेक डीलर्स कारमध्ये सनरूफ इन्स्टॉल करून देतात. तसेच तुम्ही मुंबई, बंगळुरू, कोलकाता सारख्या शहरांमध्ये देखील असे डीलर्स मोठ्या प्रमाणात पाहू शकता. कारमध्ये सनरूफ बसवण्यासाठी ४ ते ५ तास लागतात. एंट्री ट्रोपिक ३०० वेबास्टो सनरूफची (Entry tropic 300 webasto) किंमत २२ हजार रुपये इतकी आहे. यादरम्यान तुमच्याकडून लेबर चार्ज म्हणून ८ ते १० हजार रुपये घेतले जातील. म्हणजेच सनरूफ बसवण्यासाठी ३० हजार रुपयांचा खर्च होईल.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/  

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.