Type Here to Get Search Results !

पुण्यात बहुली रस्त्यावर पीएमपीएमएलच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

 


पुणे दि ०५ ऑगस्ट २०२२ (चेकमेट टाईम्स): कोंढवे धावडे येथे पीएमपीएमएलच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. शंकर बबन काळे (वय वर्षे ३१) असे त्यांचे नाव आहे. हे मार्केटयार्ड परिसरात हमालीचा व्यवसाय करीत होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, आई व दोन भाऊ असा परिवार आहे. गुरुवारी संध्याकाळी ५ वाजता काळे हे आपल्या दुचाकीवरून कुडजे गावाकडे जात असताना ही घटना घडली.

निष्काळजीपणे वाहन चालवून दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल बस चालक कमलाकर पांडुरंग शेवाळे (वय वर्ष २९) यांच्यावर भा द वि कलम २७९,३०४ (अ) सह मोटार वाहन अधिनियम ११९/१७७ प्रमाणे उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर, पोलीस निरीक्षक अर्जुन बोत्रे , सहाय्यक पोलीस निरीक्षक डी के पवार घटनास्थळी पोहोचले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार तसेच पोलीस उपनिरीक्षक दिपाली लुगडे करत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/  

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.