Type Here to Get Search Results !

मांजरीतील बोगस ग्रामसभाप्रकरणी १० जणांवर गुन्हा दाखल करा; प्रशांत शिर्के यांचे आदेश

 


पुणे दि.०४ ऑगस्ट (चेकमेट टाईम्स): मांजरी खुर्द (ता. हवेली) येथे ग्रामपंचायतीने बोगस ग्रामसभा घेतल्याचे चौकशीदरम्यान समजले असून, या प्रकरणी तत्कालीन सहा सदस्यांसह १० जण दोषी असल्याचे आढळून आले आहे. या सर्वांवर लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा आदेश हवेली पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रशांत शिर्के यांनी दिला आहे. या दहा जणांमध्ये तत्कालीन सहा ग्रामपंचायत सदस्यांसह एक ग्रामस्थ,तत्कालीन ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायतीचे लेखनिक (क्लर्क), शिपाई यांचा समावेश आहे. याप्रकरणी मांजरीतील ग्रामस्थ संदीप ज्ञानोबा उंद्रे यांनी १० सप्टेंबर २०२० रोजी तक्रार दिली होती. ही बोगस ग्रामसभा मांजरी खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात २८ फेब्रुवारी २०२० ला घेण्यात आल्याचा आरोप उंद्रे यांनी तक्रारीत केला होता.

या तक्रारीवरून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश हवेलीचे गट विकास अधिकारी प्रशांत शिर्के यांना दिला होता. यानुसार शिर्के यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी विस्तार अधिकारी (पंचायत) एन. डी. कारंडे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. कारंडे यांनी त्यांचा चौकशी अहवाल २० नोव्हेंबर २०२० ला गट विकास अधिकाऱ्यांकडे सूपूर्द केला होता. मांजरी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात ही विशेष ग्रामसभा झालेली नसतानासुद्धा ही सभा झाल्याचे कागदोपत्री दाखविण्यासाठी ग्रामसभा प्रोसेडिंगमध्ये खोटे रेकॉर्ड तयार करण्यात आल्याचे या चौकशीतून निष्पन्न झाले आहे. शिवाय अनेक गंभीर, नियमबाह्य व बेकायदेशीर बाबी या चौकशीतून पुढे आल्याचे या चौकशी अहवालातून स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी दोषी आढळून आलेल्यांमध्ये विकास उंद्रे, हिरामण गवळी, धनश्री उंद्रे, बेबी उंद्रे, मनीषा उंद्रे, वर्षा मोरे हे तत्कालीन सहा ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ रोहिदास उंद्रे, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी राजेंद्र कदम, ग्रामपंचायतीचे लेखनिक (क्लार्क)) रामदास उंद्रे आणि शिपाई विठ्ठल सावंत यांचा समावेश आहे. दरम्यान, याप्रकरणी ग्रामस्थ रोहिदास उंद्रे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र कदम यांच्याशी मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.

माझा सरपंच पदाचा कार्यकाळ संपत आला होता. त्यामुळे कार्यकाळाअभावी मला ही ग्रामसभा आयोजित करता आली नाही. परंतु माझा कार्यकाळ संपल्यानंतर मागची तारीख दाखवून ही ग्रामसभा झाल्याचे बोगस रेकॉर्ड तयार करण्यात आले आहे. त्यामुळे ही ग्रामसभा बोगस आहे. या बोगस ग्रामसभेला मी उपस्थित नव्हतो. तसेच कोणत्याही रेकॉर्डवर मी सही केलेली नाही.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.