पुणे दि.०३ ऑगस्ट (चेकमेट टाईम्स): स्वत:च्या कामाचे प्रोजेक्शन करण्यासाठी दुसऱ्याच्या कामाचा अवमान
कशासाठी? तुम्हाला काही नवे सापडले तर ते लिहा, त्यात दम असेल तर लोक वाचतील, अशा शब्दांत
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्या काही
दिवसांपूर्वीच्या वक्तव्याचा समाचार घेतला. त्यांनी शरद पवार यांचे थेट नाव घेतले
नाही, मात्र त्यांचा भावार्थ लक्षात
घेत सभागृहातील श्रोत्यांनी टाळ्या वाजवून त्यांना दाद दिली.
महाराष्ट्र
कीर्ती सौरभ प्रतिष्ठानच्या वतीने सोमवारी सायंकाळी बालगंधर्व रंगमंदिरात शिवशाहीर
बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार व मोरेश्वर पुरंदरे शिष्यवृत्ती कार्यक्रम झाला.
प्रसिद्ध गायिका उषा मंगेशकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. चंद्रकांत
पाटील यांच्या हस्ते मूर्तिशास्त्राचे अभ्यासक गो. बं. देगलुरकर यांना पुरस्कार व
मोडी लिपीचे अभ्यासक संदीप तिखे यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. पोलीस आयुक्त
अमिताभ गुप्ता, माजी खासदार प्रदीप
रावत, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यावेळी व्यासपीठावर उपस्थित
होते.
पाटील म्हणाले, नवे काही सापडले असेल तर त्यावर लिहा, लोकांसमोर आणा, ते फुकट वाटा. त्यात दम असेल तर लोक
वाचतील. मात्र जे आहे ते नष्ट का करता? करायचेच असेल तर मग
नवा पर्याय द्या. नवे काय आहे ते सांगा.
पुरंदरे व
त्यानंतर आत्ताच देगलुरकर यांनी आपल्यापुढे कोणता काळ आला आहे, येणार आहे याचे वर्णन करून ठेवले आहे. अयोध्येच्या
राम मंदिरातील मूर्ती कशा असाव्यात, कशाच्या असाव्यात यासाठी
सुरू असलेल्या चर्चेत देगलुरकर यांचाही सहभाग आहे. त्या मूर्ती अशा असतील की,
मंदिरात आत गेल्यावर त्या आत घुसतील व तू कोण आहे ते सांगतील.
देगलुरकर यांनी यावेळी सर्वच धर्मात मूर्ती पूजा आहे, असे
स्पष्ट करत फक्त हिंदू धर्मच असा आहे की जो जाहीरपणे आमच्यात मूर्ती पूजा आहे
म्हणून सांगतो, असे प्रतिपादन केले. बाबासाहेबांबरोबर
असलेल्या स्नेहाला त्यांनी उजाळा दिला.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल
मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84