पुणे दि.०४
ऑगस्ट (चेकमेट टाईम्स): शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पुणे पोलिस
मैदानात उतरले असून त्यासाठी त्रिसुत्री उपक्रम हाती घेण्यात आला आहे. प्रत्येक
पोलीस ठाण्यातंर्गत शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या
सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये गुड टच बॅड टच
जनजागृतीसह पालकांना सजग राहण्याचे आवाहन, शालेय वाहतुकीवर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवले
जाणार आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार आता ठाणेप्रमुखांना
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
नागरिकांना
शालेय पाल्यांच्या सुरक्षिततेची चिंता सातत्याने भेडसावत असल्याचे दिसून आले आहे.
विशेषतः प्रवासादरम्यान मुलगा-मुलगी व्यवस्थितरित्या शाळेत पोहोचतात का, पाल्यांना बॅड टचला
सामोरे जावे लागते का, शालेय परिसरात मुला-मुलींमध्ये सुरक्षिततेची
भावना तयार होते का, याबाबत पालकांच्या मनामध्ये असंख्य प्रश्न
उपस्थित होत आहेत. त्यातच मागील काही दिवसांपुर्वी कोंढवा परिसरात बसचालकाने
मुलीवर केलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर पालकांमध्ये भीतीचे वातावरण गडद झाले
आहे. त्याशिवाय मुलांना शाळेत ने-आण करताना रिक्षाचालकांच्या वागणूकीबद्दलची
प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये जनजागृती
करण्यासाठी पुणे पोलिसांनी त्रिसुत्री उपक्रम हाती घेतला आहे.
पुणे
पोलिसांकडून चाईल्ड सेफ्टीतंर्गत विद्यार्थ्यांना गुड टच, बॅड टच, चाईल्ड
हेल्पलाईन, सुरक्षित शालेय वाहतुकीवर भर दिला आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त पालकांच्या
सहभागावर लक्ष केंद्रित केले आहे. पालकांनो सजग व्हा, आपल्या
मुला-मुलींच्या सुरक्षिततेची काळजी घ्या असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
शालेय समितींद्वारे वेगवेगळ्या बैठकीतून विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक, विद्यार्थिनींना
प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करून मार्ग काढले जाणार आहेत. गुड टच, बॅड टचचे
प्रशिक्षणही देण्यासंदर्भात काम हाती घेण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून
शहरातील काही भागात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यामुळे पुणे पोलिसांनी कंबर कसली असून, प्रत्येक पोलीस ठाण्यातंर्गत विद्यार्थ्यांच्या
सुरक्षिततेबाबत विशेष काळजी घेण्यात येत आहे.
शालेय विद्यार्थिंनीच्या
मदतीसाठी दामिनी पथकही कार्यरत असणार आहे. विविध पोलीस ठाण्यातंर्गत कार्यरत
दामिनी पथकातील महिला अमलदारांकडून विद्यार्थिंनीमध्ये हितगुज करण्यावर भर दिला
जाणार आहे. त्यामुळे मुलींची छेडछाड, पाठलाग, टिंगलटवाळी रोखण्यास मदत होणार आहे. विशेषतः
विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यावरही दामिनी पथकाकडून प्राधान्य
दिल्यामुळे अघटित घटनांना आळा बसणार आहे.
”शहरातील विविध शालेय विद्यार्थ्यांमधील भीती नष्ट करण्यासाठी पुणे पोलिसांकडून
विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार सुरक्षित विद्यार्थी वाहतूक, रस्ते प्रवासात
विद्यार्थ्यांची सुरक्षितता, पालकांमधील जनजागृतीवर भर दिला आहे. त्याशिवाय
सोशल मीडियाद्वारेही वेगवेगळ्या आवाहनानुसार विद्यार्थी सुरक्षिततेला प्राधान्य
देण्यात आले आहे.”
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84