Type Here to Get Search Results !

खडकवासला ते फुरसुंगी बोगदा; माती तपासणीचे काम प्रगतीपथावर

 


पुणे दि ०५ ऑगस्ट २०२२ (चेकमेट टाईम्स): बोगदा ज्या भागातून जाणार आहे, ते मार्ग म्हणजे खडकवासला धरण ते फुरसुंगी या मार्गावरील ५० टक्के माती परीक्षणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. येत्या दोन महिन्यांत हे काम पूर्ण करून बोगद्याचे डिझाइन आणि अंदाजपत्रक निश्‍चित केले जाईल. त्यामुळे या वर्षाच्या अखेरीस प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होण्याची शक्यता आहे.

खडकवासला धरणातून कालव्यात सोडल्या जाणाऱ्या पाण्याचे बाष्पीभवन, गळती व चोरीमुळे सुमारे अडीच टीएमसी पाणी वाया जाते. शिवाय कालव्यात पडणाऱ्या कचऱ्यामुळे पाणी प्रदूषित होते. यामुळे खडकवासला धरण ते फुरसुंगी असा २५ किलोमीटर लांबीच्या बोगद्यामधून पाणी नेण्याची योजना आखली होती. मात्र, निधी कसा उभारावा, या प्रश्नामुळे ही योजना अनेक वर्षं रखडली होती. मध्यंतरी या योजनेला चालना देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारकडून घेण्यात आला. त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याच्या सूचनाही राज्य सरकारने दिल्या होत्या. त्यानुसार निविदा मागवून एका खासगी कंपनीला हे काम दिले. संबंधित कंपनीने दोन महिन्यात सर्वेक्षण पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल सादर केला आहे, त्याला मान्यता मिळाल्यानंतर या प्रकल्पाचा डीपीआरतयार करण्याचे काम हाती घेतले आहे.

ज्या मार्गाने बोगदा जाणार आहे, त्या मार्गावरील जमिनींची मृदा तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येक अर्धा किलोमीटर अंतरावर बोअर खोदण्यात येत आहेत. आतापर्यंत जवळपास पन्नास टक्के काम पूर्ण झाले आहे. पुढील दोन महिन्यात हे काम पूर्ण होईल. त्यानंतर प्रकल्पाचा आराखडा आणि अंदाजपत्रक तयार करण्यात येईल, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे या वर्षअखेरपर्यंत प्रकल्पाचा डीपीआर तयार होऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल, असेही ते म्हणाले.

बोगद्याचे काम टीबीएम मशिनच्या साहाय्याने करायचे झाल्यास सुमारे अडीच हजार कोटी रुपये खर्च येऊ शकतो, तर डीबीएम (ड्रील अँड ब्लास्ट) पद्धतीने हे काम केले, तर त्यासाठी दीड हजार कोटी रुपये खर्च येऊ शकतो. त्यामुळे हे काम कोणत्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करायचे, याचा निर्णय शासन स्तरावर अद्याप झालेला नाही. दरम्यानच्या कालावधीत बोगद्यासाठी जमीन योग्य आहे कि नाही, यासाठी बोअर खोदण्याचे काम सुरू केले आहे. ते पूर्ण झाल्यानंतर याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

७.८० मीटर रुंद, ३.९० मीटर उंच आणि १.९५० मीटर गोलाकार उंची अशा डीआकाराच्या बोगद्यातून खडकवासला धरण ते फुरसुंगीदरम्यान बोगद्यातून पाणी नेण्याचा प्राथमिक आराखडा निश्‍चित केला आहे. या बोगद्यामुळे कालव्याची क्षमता एक हजार ५१० क्युसेक होणार असून, ते सर्व पाणी गुरुत्वाकर्षण शक्तीने फुरसुंगीपर्यंत नेण्यात येणार आहे. त्यामुळे पाण्याचे प्रदूषण, गळती आणि बाष्पीभवन रोखण्यास मदत होऊन अडीच टीएमसी पाणी वाचणार आहे. भूमिगत कालवा तयार करताना कालव्याच्या मार्गात काही ठिकाणी बदल होणार आहे. त्यासाठी ५८ हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. बोगद्यातून पाणी नेण्याच्या कामासाठी सुमारे दीड हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/  

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.