Type Here to Get Search Results !

पुण्यात पुन्हा लाखोंचा गुटखा जप्त, विमलचा साठा पकडला

 


पुणे दि ०५ ऑगस्ट २०२२ (चेकमेट टाईम्स): गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने भवानी पेठ परिसरातील एका सोसायटीच्या तळमजल्यावरील फ्लॅटमध्ये माणिकचंद गुटखा, विमल पान मसाल्यासह नामांकित कंपन्यांचा तब्बल १४ लाख ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या पथकाने ही कारवाई केली असून अवैधरीत्या साठा केल्याप्रकरणी दोघांवर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे.

परवेज अन्सारी (रा. लोहियानगर), नफिज अन्सारी (रा. कोंढवा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. आरोपींवर अन्न सुरक्षा मानके कायदा (२००६), अन्न सुरक्षा मानदे कायदा प्रोव्हिबिशन अँण्ड रिस्ट्रीक्शन ऑन सेल नियमन २०११ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात अवैधरीत्या गुटखा वाहतूक करणे, विक्री करण्यास बंदी आहे. मात्र, तरीही अनेक भागात छुप्या पद्धतीने गुटखा विक्री सुरू असून पोलिसांकडून अशा ठिकाणी कारवाई केली जात आहे. समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाना पेठेतील देविका सोसायटीच्या तळमजल्यावरील फ्लॅटमध्ये गुटखा, विमल पानमसाला आदी तंबाखूजन्य पदार्थांचा साठा करून ठेवल्याची माहिती कर्मचारी शिवानंद कायगुडे, सँडी साबळे यांना मिळाली होती. त्यांनी गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिल्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला.

छापा टाकलेल्या फ्लॅटमध्ये विमल पान मसाला, आर.एम.डी माणिकचंद, शिमला पान मसाला, हिरा पान मसाला, राजनिवास पान मसाला, सोसायटी पान मसाला, तुलसी पान मसाला असा तब्बल १४ लाख ३९ हजार ९६१ रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थाचा साठा मिळून आला. पोलिसांनी हा साठा जप्त केला असून परवेझ आणि नफिज यांच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, युनिट एकचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कामगिरी केली. पुढील तपास युनिट एकचे पोलीस उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी करत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/  

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.