पुणे दि ०५ ऑगस्ट २०२२ (चेकमेट टाईम्स): आपल्या
आजूबाजूला आपण अनेक गुन्हेगारीच्या घटना ऐकतो. यातील बहुतांश घटनांमध्ये
गुन्हेगार हा नक्कीच कोणत्या ना कोणत्या अंमली पदार्थाच्या व्यसनाखाली असतो. व्यसनामुळे माणसाच्या शरीराबरोबरच
त्याचे जीवनही उद्ध्वस्त होते. मार्केटमध्ये अशी अनेक रासायनिक उत्पादने आहेत, ज्यातून
लोक नशा करत आहेत. रंग, कफ सिरप, पेट्रोल, टायर
पंक्चर ट्यूब, नेलपॉलिश यांचाही नशेत वापर केला जातो.
तुम्हाला ही विचित्र वाटेल, पण पश्चिम बंगालमधील तरुण कंडोमपासून नशा करीत आहेत, तुम्हाला विश्वास
बसणार नाही पण, हे सत्य आहे. पश्चिम बंगालमध्ये कंडोमची विक्री अचानक वाढल्याने बाजारातून
कंडोम संपले आहेत. फ्लेवर्ड कंडोमच्या मागणीत त्यामुळे प्रचंड वाढ होऊन कंडोम
पासून नशा होत असल्याचे जाणून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. जाणून घ्या, तरुणाई कंडोमची नशा कशी करतात.
पश्चिम बंगालमधील दुर्गापूरमधील
तरुणांमध्ये कंडोमचे व्यसन खूप लोकप्रिय झाले आहे. ते बाजारातून फ्लेवर्ड कंडोम
घेतात आणि गरम पाण्यात तासभर भिजत ठेवतात. एक तासानंतर, ते पाणी पितात, ज्याची
नशा सुमारे १० ते १२ तास टिकते. वास्तविक, दुर्गापूरमध्ये
अनेक विद्यार्थी राहतात जे घरापासून दूर वसतिगृहात राहतात. वसतिगृहात राहून
त्यांना सिगारेट, दारू अशा अनेक प्रकारच्या नशेचे व्यसन
लागले आहे. अल्कोहोल आणि इतर नशा कंडोमपेक्षा खूप महाग आहेत. ते त्यांच्या खिशातून
सहज कंडोम काढू शकतात आणि ते घेण्यासाठी त्यांना डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनचीही
गरज नसते. परिणामी विद्यार्थी फ्लेवर्ड कंडोमची नशा करत आहेत.
फ्लेवर्ड कंडोमचा वापर नशा
म्हणून केला जात आहे, असा खुलासा एका
विद्यार्थ्याने केला आहे. वास्तविक, पश्चिम बंगालमधील
दुर्गापूर सिटी सेंटर, विधान नगर, बेनाचिटी
आणि मुचीपारा, सी-झोन, ए-झोन दुर्गापूर
भागात कंडोमची मागणी अधिक वाढली होती. विक्री वाढू लागल्यावर एका दुकानदाराने
विद्यार्थ्याला याबाबत विचारले. जेव्हा दुकानदाराने त्याच्या नियमित ग्राहकाला
विचारले, की तो दररोज कंडोम का घेऊन जातो, तेव्हा त्याने सांगितले, की तो मद्यपान करण्यासाठी
दररोज कंडोम खरेदी करतो. दुर्गापूरमधील एका मेडिकल दुकानदार जयदेव कुंडू सांगतात,
की कंडोमची विक्री अचानक वाढली होती. कॉलेज कॅम्पसमध्ये फक्त
विद्यार्थीच जास्त कंडोम खरेदी करत असल्याचे आमच्या लक्षात आले.
कंडोमची
नशा खूप धोकादायक आहे रसायनशास्त्राचे शिक्षक नुरूल हक यांच्या मते, फ्लेवर्ड कंडोमच्या
नशेत विषारी संयुगे असू शकतात, ज्यामुळे कर्करोग होऊ
शकतो. त्यामुळे त्याची नशा टाळावी. सध्या तरुणांना नशा करणे चांगले वाटत असले तरी
भविष्यात त्याचे गंभीर दुष्परिणामही होऊ शकतात.
वरील वृत्त खाली
लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत
असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू
शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84