Type Here to Get Search Results !

महिला बचत गटाच्या माध्यमातून वारजे येथे महिला मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन.

 


पुणे दि ०५ ऑगस्ट २०२२ (चेकमेट टाईम्स): महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या शांता नेवसे यांनी विठ्ठल रुक्मिणी समाज मंदिर, विठ्ठलनगर, वारजे येथे महिलांना वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यासाठी बँक ऑफ इंडियाचे कर्ज व्यवस्थापिका त्रिभुवन यांनी बँक ऑफ इंडियाच्या विविध कर्ज योजना विषयी सविस्तर माहिती दिली.

महिलांना आर्थिक विषयावर साक्षर करण्याची गरज आहे आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यास  बचत गटाला बँक सहकार्य करते असे प्रतिपादन केले. पालकत्व फाउंडेशन संस्थेचे विक्रम ननवरे सर यांनी पालकत्वच्या समस्येबद्दल महिलांना मार्गदर्शन केले. मुलांचे करिअर ठरवताना योग्य काउंसलिंग घेणे गरजेचे आहे असाही विचार मांडला. 'गिरी अकॅडमी' चे गिरी यांनी कोरोना नंतर शैक्षणिक व्यवस्थेत बदल झाल्यामुळे मुलांकडे जास्त लक्ष देऊन त्यांना संकल्पना समजून सांगण्यावर भर दिला पाहिजे अशी भावना यावेळी व्यक्त केली.

दहावी पास झालेल्या मुलांसाठी आयआयटी जेईई व नीट परीक्षांच्या तयारीसाठी एक चांगले शैक्षणिक संस्था वारजे परिसरात उभी केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. दामिनी पथकाच्या घोळवे यांनी महिला सुरक्षा विषयी पोलिसांची सजग भूमिका लोकांना समजावून सांगितले. महिला सुरक्षिततेसाठी पोलीस दल व दामिनी सुरक्षा पथक नेहमीच कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी दिला.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/  

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.