Type Here to Get Search Results !

मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

 


पुणे दि ०५ ऑगस्ट २०२२ (चेकमेट टाईम्स): वानवडी मध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी चार तरुणींना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी मसाज सेंटरची व्यवस्थापक झारणा उर्फ पिंकी गौतम मंडल (वय २७, मूळ रा. पश्चिम बंगाल), सुमीत अनिल होनखंडे (वय २१, रा. कोंढवा) यांना अटक करण्यात आली आहे. मसाज सेंटरची मालकीण रचना संतोष साळुंखे (रा. येवलेवाडी), सार्थक लोचन गिरमे, लोचन अनंता गिरमे (दोघे रा. वानवडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वानवडी भागातील साळुंके विहार रस्त्यावरील एका इमारतीत गोल्डन टच स्पा नावाच्या मसाज सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली.

पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा केली. त्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकून चार तरुणींना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणी मूळच्या छत्तीसगड, पश्चिम बंगाल तसेच महाराष्ट्रातील आहेत. अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर, नीलम शिंदे, राजश्री मोहिते, सुरेंद्र साबळे, अजय राणे, इरफान पठाण आदींनी ही कारवाई केली.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/  

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.