पुणे दि.०४ ऑगस्ट (चेकमेट टाईम्स): एक खोली नावावर करण्याच्या वादातून मोठ्या बहिणी
भावानेच केला २३ वर्षाच्या लहानभावाचा खून. पाच वर्षांपूर्वी घडलेल्या खूनाला वाचा फुटली
अन् बहिण-भावाच हैवानी कृत्य समोर आले आहे. पोलीसांनी तब्बल १०० आकस्मिक मृत्यूची
तपासणी अन वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या तपासानंतर या खूनाला वाचा फुटली आहे.
पंकज
चंद्रकांत दिघे (वय २३, एरंडवणा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर,
कॅनोलमध्ये ढकलून देणारा मित्र
महेश बाबुराव धनावडे (वय ३७, शिवणे) याला अटक केली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात
पंकजचा भाऊ सुहास चंद्रकांत दिघे (वय २९), बहिण अश्विनी आडसुळ यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला
आहे. याबाबत पोलीस हवालदार राजेंद्र मारणे (वय ५१) यांनी तक्रार दाखल केली आहे.
पंकज आणि
सुहास, अश्विनी हे
सख्खे भाऊ बहिण आहेत. पकंजला अश्विनीसोबत आणखी तीन बहिणी आहेत. त्यांची लग्न
झालेली आहेत. दिघे कुटूंब एरंडवणा परिसरात राहत होते. पंकजच्या आईचे आजाराने निधन
झाले आहे. पंकज काही काम करत नव्हता. तो राहत्या घरातील एक खोली माझ्या नावावर करा,
असे म्हणून वाद घालत होता. आईला
देखील तुम्हीच मारले असे म्हणत असत. त्यावरून सुहास व अश्विनी यांनी त्याला ठार
मारण्याचा कट रचला.
मित्र महेश
व प्रशांत यांच्या मदतीने पाच वर्षांपूर्वी (दि. १४ मार्च २०१७) सायंकाळी त्याला
चौघांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर महेशच्या टवेरा कारमध्ये त्याला घालून
डेक्कनमधील कॅनोलमध्ये ढकलून देत त्याचा खून केला. पाच दिवस याबाबत काहीएक न बोलता
त्याच्या पाचवी दिवशी (दि. १९ मार्च २०१७) डेक्कन पोलीसांकडे भाऊ सुहासने पंकज
बेपत्ता आहे, अशी तक्रार
दिली. त्यानंतर त्याचा शोध देखील घेतला नाही. दरम्यान,
पंकजचा मृतदेह कॅनोलने वाहून
हडपसरमध्ये मिळून आला. त्याबाबत हडपसर पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
परंतु, त्याबाबत
कोणच न आल्याने त्याचे शासकीय नियमानुसार अत्यंविधी केला गेला.
दरम्यान,
गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे
पोलीस हवालदार राजेंद्र मारणे यांना बातमीदारामार्फत पंकजसोबत घडलेल्या घटनेची
माहिती मिळाली. त्यांनी पोलीस निरीक्षक अनिता मोरे यांच्या कानावर ही बाब घालत
तपासाला सुरूवात केली. प्रथम त्यांनी पंकजचे मिसींग कुठे दाखल आहे,
याचा शोध घेतला. त्यांनतर डेक्कन
येथे मिसींग असल्याचे समोर येताच मृतदेह कुठे आढळून आला का,
याची माहिती घेण्यास सुरूवात
केली. त्यांना हडपसरमध्ये मृतदेह आढळल्याचे समजले. त्याची खात्री पटवत पोलीसांनी
तपासाला सुरूवात केली. परिसरात फिरून माहिती घेतल्यानंतर घटना पाहिलेला एक
प्रत्यक्षदर्शी देखील सापडला. त्याच्याकडून माहिती घेतल्यानंतर आरोपी महेश धनावडे
याला ताब्यात घेऊन सखोल तपास केल्यानंतर त्याने घटनेची माहिती दिली. त्यांनतर या
खूनाचा उलगडा झाला. पोलीस निरीक्षक अनिता मोरे व पोलीस हवालदार राजेंद्र मारणे
यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
शहरात
कॅनोलमध्ये मृतदेह आढळून येण्याच्या घटना सतत घडत आहेत. मृतदेह ज्या हद्दीत आढळतील
त्याठिकाणी त्याची आकस्मिक मृत्यूची नोंद केली जाते. पोलीसांनी,
लष्कर,
सिंहगड,
डेक्कन,
मुंढवा,
वानवडी,
हडपसर या पोलीस ठाण्यांमधील तब्बल
१०० च्या जवळपास आकस्मिक मृत्यूची तपासणी केली. हडपसरमध्ये दाखल असणाऱ्या एका
इडीचा तपास केल्यानंतर पंकजचा मृतदेहाची ओळख पटविली. पंकजच्या एका हातावर आई आणि
दुसऱ्या हातावर पंकज असे गोंदलेले होते. त्यावरून त्याचा मृतदेह ओळखला गेला.
सुहासने
महेशच्या खूनाचा देखील कट रचला होता. पंकजला मारल्याची माहिती त्याला होती अन
त्यानेच त्याला कॅनोलमध्ये ढकलून दिले होते. महेशला मारल्यानंतर पुरावाच नष्ट होईल
आणि हे प्रकरण कधीच समोर येणार नाही, असा त्याचा समज होता. त्यामुळे त्याने महेशला मारण्याचा कट
रचला होता. ताम्हिणी घाटात पार्टीच्या निमित्ताने त्याला घेऊन देखील गेले होते.
परंतु, तो डाव
फसला गेला.
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७
या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84