Type Here to Get Search Results !

कुंडलीत दोष असल्याने तरुणीचा लग्नास नकार, तरुणाकडून लैंगिक संबंधांची मागणी; पुन्हा शादी डॉट कॉम

 


दि.०४ ऑगस्ट (चेकमेट टाईम्स): आजकालच्या ऑनलाईन युगात लग्न ठरवण्यासाठी शादी डॉट कॉम या वेबसाईट चा वापर खूप लोक करत असतात. शादी डाॅट काॅम या वेबसाईटवरुन आेळख झालेल्या एका तरुणाने तरुणीसाेबत बाेलणे करुन लग्न करण्याबाबत ठरवले. मात्र, सदर दाेघांची कुंडली पत्रिका गुरुजीकडे पाहिल्यानंतर, दाेघांचे कुंडलीत दाेष असल्याने तरुणीने तरुणा साेबत लग्नास नकार दिला. यामुळे चिडलेल्या तरुणाने तिच्याकडे लैंगिक गाेष्टीची मागणी करुन तिला जीवे मारण्याची धमकी देत बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत आरोपीवर मंगळवारी वू हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली आहे.

याप्रकरणी २९ वर्षीय पिडित तरुणीने चिखली पाेलीस ठाण्यात आराेपी कुणाल सिंग (रा.मुंबई) याच्या विराेधात फिर्याद दाखल केली आहे. सदर तरुणी उच्चशिक्षित असून खासगी कंपनीत नाेकरी करत आहे. मार्च २०२२ ते जुलै २०२२ यादरम्यान तिची आराेपी साेबत शादी डाॅट काॅम या वेबसाईटवर ओळख झाली हाेती. त्यानंतर दाेघात चांगल्याप्रकारे ओळख झाल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचे ठरवले हाेते. परंतु लग्नापूर्वी कुंडली दाखविण्याचा कार्यक्रम झाला असता, कुंडलीत दाेष असल्याने तरुणीने लग्नास नकार दिला. यामुळे कुणाल सिंग याने राग धरुन तरुणीकडे लैंगिक गाेष्टीची मागणी करुन तिला मारण्याची धमकी दिली. तसेच तिने लग्न करण्यास नकार दिला असतानाही त्याने तिचा पाठलाग करुन इन्स्टाग्रामवरुन तिचे नातेवाईक, मित्र, मैत्रिणी यांना तिची बदनामी हाेईल अशाप्रकारचे मेसेज पाठविले. त्यामुळे याबाबत तरुणीने चिखली पाेलिस ठाण्यात आराेपी विराेधात तक्रार दाखल केली असून पाेलीस आराेपीचा शाेध घेत आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/  

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.