Type Here to Get Search Results !

शिवण्यात वाळू माफियांविरोधात तहसीलदारांची धडक कारवाई; जेसीबी, डंपर जप्त

 


पुणे दि ०५ ऑगस्ट २०२२ (चेकमेट टाईम्स): भर पावसात शिवणे येथील मुठा नदी पत्रातून वाळू चोरून नेणाऱ्यांच्या ट्रॅक्टर व जेसीबी या वाहनांना स्वतःची मोटार आडवी घालून रोखण्याची सिनेस्टाईल कामगिरी तहसीलदार तृप्ती कोलते यांनी केली आहे. यातील आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले असले तरी त्यांचे ट्रॅक्टर व जेसीबी मशीन जप्त करण्यात महसूल व पोलीस विभागाला यश आले आहे.

शहरी भागात चालू असलेला अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी पावले उचलली जात असली तरी आरोपींना पकडण्यात यश काही येत नव्हते. शुक्रवारी रात्री जिल्हाधिकारी यांना शिवण्यात वाळू उपसा करण्यासाठी वाहने व यंत्रे जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तहसीलदार यांना पुढील कारवाई करण्यास सांगितले. त्याप्रमाणे तहसीलदार कोलते यांनी यांनी आधी पोलिसांना कळवून शिवण्याकडे प्रयाण केले. नदीपात्रातून बाहेर येण्यासाठी शिवणे नांदेड पुलाजवळ जी अरुंद जागा आहे तेथेच आपले मोटर आणून तहसीलदार यांनी समोरून येणाऱ्या गाड्यांना रोखले. गाड्या निघायला जागाच शिल्लक नसल्याने या गाड्या तेथेच थबकून राहिल्या व त्यातील ड्रायव्हर व इतर कामगारांनी पोलीस येण्यापूर्वीच अंधारात नदीपात्रात धूम ठोकली.

पोलीस १० मिनिटे उशिरा पोहोचल्याने तस्करांना रंगेहाथ पकडणे शक्य झाले नसले तर जेसीबी मशीन ट्रॅक्टर व चाळणी जप्त केल्याने त्याच्या नंबर वरून तपास केल्यास ही वाहन मालक व तस्करांचा शोध घेणे शक्य असल्याचे मत तृप्ती कोलते पाटील यांनी व्यक्त केले. या प्रकरणी मंडल अधिकारी प्रमोद भांड यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जवळगी करीत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/  

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.