Type Here to Get Search Results !

एसटी चालकाने स्टेअरिंगवरच सोडला जीव, मृत्यूपूर्वी २५ प्रवाशांचा वाचवला जीव

 


पुणे दि ०५ ऑगस्ट २०२२ (चेकमेट टाईम्स): आजपर्यंत आपण स्वतःच्या जिवापेक्षा कर्तव्य महत्वाचे वाटणारे लोक फक्त सैन्यातच पहिले असतील, त्यांचे किस्से ऐकले असतील, आपल्या महामंडळाच्या एसटी मंडळातील चालकांकडूनही असे कर्तव्य बजावले गेले. स्वत:चा काळ आला असताना चालकाने एसटीमध्ये बसलेल्या तब्बल २७ प्रवाशांना सुखरूप आणि सुरक्षित केले आणि त्यानंतरच जगाचा निरोप घेतला. एखाद्या पुस्तकात वाचावी अशीच घटना आज पुरंदर तालुक्यातील राजगडाजवळ घडली आणि त्या जिगरबाज चालकाचे नाव जालिंदर रंगराव पवार आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, तीन ऑगस्ट रोजी वसई-म्हसवड (सातारा) ही एसटी बस (एमएच १४, बीटी ३३४१) दुपारी दीडच्या सुमारास स्वारगेट स्थानकात आली. तेथे चालकांची बदली झाली आणि गाडीचा ताबा जालिंदर रंगराव पवार (वय ४५, रा. पळशी, ता. खटाव, जि.सातारा यांनी घेतला. त्यानंतर गाडी म्हसवडच्या दिशेने रवाना झाली. पुणे-सातारा महामार्गावर खेड-शिवापूर टोलनाक्याच्या पुढे वरवे गावाच्या हद्दीत आल्यानंतर गाडीचा वेग अचानक मंद झाला. त्यावेळी त्यांचे सहकारी वाहक संतोष गवळी यांनी केबिनजवळ जाऊन त्यांना गाडीचा वेग कमी का केला असे विचारले, त्यावेळी पवार यांचा चेहरा घामाने भिजून गेला होता, मला चक्कर येत आहे असे सांगितले. त्यांना असह्य वेदना होत असतानाही गाडीवरचे नियंत्रण सोडले नाही आणि गाडी सावकाश रस्त्याच्या डाव्या कडेला लावली व सुरक्षित थांबविली. त्यावेळी त्यांच्या छातीमध्ये प्रचंड कळ आली आणि त्यांनी स्टेअरिंगवरच डोके ठेवले. त्यांना उठविण्यासाठी वाहक गवळी केबिनमध्ये धावून आले. त्यांनी त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला; मात्र ते उठले नाहीत. त्यानंतर गाडीचा ताबा एका प्रवाशाने घेतला व गाडी तातडीने जवळच असलेल्या नसरापूर येथील सिद्धिविनायक येथील रुग्णालयात नेली.

पंचवीस प्रवाशांसह गाडी रुग्णालयात पोचली. चालकाला हृदयविकाराचा झटका आला असावा, अशी कल्पना एसटीतील सर्वच प्रवाशांना आली होती. त्यामुळे जालिंदर यांना रुग्णालयात उपचारासाठी नेल्यावर प्रत्येक प्रवाशी त्यांच्या सुखरूपतेसाठी प्रार्थना करत होता. मात्र सर्व प्रवाशांचा जीव वाचविण्यासाठी अगदी वेळेवर एसटी बाजूला उभी करणाऱ्या जालिंदर यांना मात्र रुग्णालयात उपचारासाठी वेळेत पोहोचता आले नाही आणि उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हृदयविकाराचा तीव्र झटका आला असतानाही जालिंदर यांनी तो सहन केला, केवळ प्रवाशांचा जीव वाचविण्यासाठी. वेगात असणाऱ्या एसटीवरील नियंत्रण सुटले असते तर कदाचित एसटीचा अपघातही झाला असता. त्यामुळे एसटीतील पंचवीस प्रवाशांबरोबर बाहेरील वाहनांच्या अपघाताची शक्यताही निर्माण झाली असती. मात्र जालिंदर यांच्या कर्तव्यदक्ष स्वभावाने मृत्यूलाही थोडा वेळ बाजूला ठेवले आणि त्यांनी प्रवाशांना सुरक्षित करून त्याच स्टेअरिंगवर देह ठेवला. या घटनेमुळे अनोळखी चालकासाठीही एसटीतील सर्व प्रवाशांचे डोळे पाणावले. त्यांच्या मृत्यूनंतर भोर येथील रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाले. त्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, नसरापुरातील एसटीवर दुसरे चालक मागवून एसटी म्हसवडला मार्गस्थ झाली.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/  

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.