Type Here to Get Search Results !

दोन हजारांच्या नोटा बाजारातून झाल्या गायब; मोदी सरकारकडून धोक्याचा इशारा

 


पुणे दि.०४ ऑगस्ट (चेकमेट टाईम्स): एनसीआरबीकडे असलेल्या आकडेवारीनुसार २०१८ ते २०२० दरम्यान जप्त करण्यात आलेल्या बोगस नोटांची संख्या वाढली आहे. बोगस नोटांची आकडेवारी देत मोदी सरकारनं हे आवाहन केलं आहे. २०१८ ते २०२० या कालावधीत बोगस नोटांचं प्रमाण वाढलं आहे. याबद्दलची आकडेवारी अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत दिली.


अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत बोगस नोटांबद्दल महत्त्वाची माहिती दिली. २०१६ मध्ये २ हजारांच्या केवळ २ हजार २७२ बोगस नोटा जप्त करण्यात आल्या. २०१७ मध्ये हा आकडा थेट ७४ हजार ८९८ वर पोहोचला. २०१८ मध्ये हे प्रमाण कमी झालं आणि ५४ हजार ७७६ वर आलं. २०१९ मध्ये २ हजाराच्या ९० हजार ५५६ नोटा जप्त करण्यात आल्या. २०२० मध्ये हेच प्रमाण थेट २ लाख ४४ हजार ८३४ वर गेलं.
२०२० नंतर २ हजाराच्या किती बोगस नोटा जप्त करण्यात आल्या याची माहिती मोदी सरकारनं दिलेली नाही. बँकिंग यंत्रणेत जप्त करण्यात आलेल्या २ हजारांच्या बोगस नोटांची संख्या २०१८-१९ ते २०२०-२१ या कालावधीत कमी झाल्याचं सरकारनं संसदेत सांगितलं. २०२१-२२ मध्ये बँकिंग यंत्रणेत २ हजाराच्या १३ हजार ६०४ नोटा आढळन आल्या. व्यवहारात असलेल्या २ हजाराच्या एकूण नोटांमध्ये बोगस नोटांचं प्रमाण ०.०००६५३ टक्के इतकं आहे.


मे महिन्यात आरबीआयचा अहवाल आला. देशात बोगस नोटांचं प्रमाण वाढत असल्याची आकडेवारी आरबीआयनं दिली. २०२१-२२ मध्ये बोगस नोटांचं प्रमाण वाढलं आहे. ५०० रुपयांच्या बोगस नोटांचं प्रमाण तब्बल १०१.९ टक्क्यांनी वाढलं आहे. तर २००० रुपयांच्या नोटांचं प्रमाण ५४.१६ टक्क्यांनी वाढलं आहे, असं आरबीआयनं अहवालातून सांगितलं.


३१ मार्च २०२२ पर्यंत बाजारात असलेल्या ५०० आणि २००० रुपयांच्या नोटांचं प्रमाण ८७.१ टक्के होतं. ३१ मार्च २०२१ पर्यंत हे प्रमाण ८५.७ टक्के इतकं होतं. ३१ मार्च २०२२ पर्यंत ५०० रुपयांचं प्रमाण सर्वाधिक होतं. हे प्रमाण ३४.९ टक्के होतं. यानंतर १० रुपयांच्या नोटेचा नंबर लागतो. बाजारात असलेल्या एकूण चलनांत १० रुपयांच्या नोटांचं प्रमाण २१.३ टक्के आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/  

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.