Type Here to Get Search Results !

हप्ता आणि फुकट दारू देण्यास नकार दिल्याने मद्यालयाची तोडफोड



पुणे दि. ०3 ऑगस्ट (चेकमेट टाईम्स): उत्तमनगर मधील इंगळे कॉलनी येथे असलेल्या ॲपल रेस्टो बार मधून पाच हजार रुपयांचा हप्ता तसेच फुकट दारू देण्याची मागणी केली, त्यास नकार दिल्याने टोळक्याने मद्यालयाची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एका सराईतासह साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी गणेश शिंदे याच्यासह साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तुकाराम सोपान इंगळे (वय ५५, रा. इंगळे कॉर्नर, एनडीए रस्ता, शिवणे) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. इंगळे यांचा शिवणे परिसरात ॲपल रेस्टो बार आहे. शिंदे आणि साथीदार मद्यालयात आले होते. दरमहा पाच हजार रुपये तसेच फुकट दारू देण्याची मागणी शिंदे आणि साथीदारांनी मद्यालयातील व्यवस्थापकाकडे केली होती. व्यवस्थापकाने नकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. ग्राहकांना धमकावले तसेच मद्यालयाची तोडफोड करुन आरोपी पसार झाले.

त्यानंतर आरोपी इंगळे यांना भेटले. दरमहा हप्ता न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या इंगळे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.