Type Here to Get Search Results !

'तुमची मुलगी काय करते?' मालिकेचे २०० भाग पूर्ण!

 


दि.०४ ऑगस्ट (चेकमेट टाईम्स): सोनी मराठी वाहिनीवरील वेगळ्या धाटणीची अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे 'तुमची मुलगी काय करते?'. चित्तथरारक असणाऱ्या 'तुमची मुलगी काय करते?' या मालिकेने नुकताच २०० भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. मालिका सध्या रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेमध्ये सध्या किलवरचा शोध सुरू आहे.

मागील २०० भागांमध्ये 'तुमची मुलगी काय करते?' या मालिकेत सावनी मिरजकर नावाची तरुणी बेपत्ता होते. त्यानंतर सुरू होते श्रद्धा मिरजकर म्हणजे तिच्या आईच्या शोधाची गोष्ट. श्रद्धा  जिवाचं रान करत सावनीला शोधून काढते. अनेक वेळा तिच्या आवाक्याबाहेर जाऊन ती गोष्टी करते. ड्रग डील करते, बंदूक हातात घेते अशा अनेक गोष्टी सावनीला शोधण्यासाठी श्रद्धा करते. अखेर अथक प्रयत्नांनंतर सावनीला शोधून काढण्यात श्रद्धा यशस्वी होते. सावनी घरी अली, तरी तिच्या मनावर झालेले आघात अजूनही पुसलेले नाहीत. अशातच इन्स्पेक्टर विजय भोसलेला किलवर जिवंत असल्याचे समजते. त्यामुळे आता सगळे  किलवरला शोधताहेत. सावनीही या कामात पोलिसांना मदत करते आहे. त्यामुळे येत्या भागांत अनेक रहस्यं उलगडली जातील. तसेच चारू किलवर असेल का, सावनीला तिचा भूतकाळ आठवेल का, मिरजकर कुटुंबाची या सगळ्यातून सुटका होईल का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे येत्या भागांमध्ये मिळतील.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/  

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.