Type Here to Get Search Results !

वाट चुकलेल्या दोन हरणांचा ४ दिवसांपासून होता गणपती माथ्यावरील एनडीएच्या मैदानात मुक्काम

 

पुणे, दि. 22 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): गेल्या तीन ते चार दिवसांपासून गणपती माथ्यालगत असलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी हद्दीच्या मोकळ्या मैदानामधील झाडीमध्ये घाबरलेले दोन हरीण झाडी-झुडपांमध्ये जवळपास चार दिवसांपासून भटकत असल्याची माहिती नागरिक महेश शेलार व जाणूबाई मोहोळ यांनी दिली.

 

बुधवारी ( दि. 21 डिसेंबर २०२२) हे दोन्ही हरीण पुन्हा दिसल्याने स्थानिक नागरिकांनी वारजे पोलिसांशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी हद्दीतून बुधवारी (दि. 21 डिसेंबर २०२२) शिवणे शिंदे पूल एनडीए मुख्य रस्त्यालगतच्या मानवी वस्तीत दोन हरीण भरकटून आल्याचे कळाले.

 

स्थानिक नागरिक, पोलीस व वन विभागाचे पथक, अ‍ॅनिमल रेस्क्यू टीम अशा जवळपास तीस ते चाळीस जणांची मानवी साखळी करून या दोन हरणांची एन. डी. ए. हद्दीत सुखरूपपणे सुटका करण्यासाठी तब्बल दोन तास प्रयत्न करूनही मानवी साखळीला घाबरून भेदरले आणि तशाच भेदरलेल्या अवस्थेतील या दोन हरणांनी पुन्हा मानवी वस्तीकडे धूम ठोकली आणि मैदानातील झाडीत भटकत राहिले.

 

माहिती मिळाल्यानंतर तातडीने घटनास्थळी दाखल झालेले वारजे पोलीस ठाण्याचे पीएसआय चंद्रकांत जवळगी, नंदकुमार चव्हाण, अमोल राऊत, विकी खिलारे आणि पोलीस कर्मचारी तसेच बावधन येथील अ‍ॅनिमल रेस्क्यू टीम, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते नीलेश वांजळे व वन्यप्राणी असोसिएशनचे प्रतीक महामुनी, निहाल पायगुडे, अल्ताफ सय्यद, अथर्व बहिरट आणि मैदानावर खेळण्यासाठी आलेल्या तरुणांच्या मदतीने भेदरलेल्या या दोन हरणांना वनक्षेत्रात हुसकाविण्याचा प्रयत्न केला. पण, ते परत मानवी वस्तीत शिरल्याचे निदर्शनास आले.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.