पुणे, दि. 29 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स):
दौंड शहरात विवाहित हिंदू तरुणाचे जबरदस्तीने
धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन संशयितांची येरवडा मध्यवर्ती
कारागृहात रवानगी केली आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध अॅट्रोसिटी प्रतिबंधक कायद्यानुसार
गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती दौंड पोलिसांनी दिली.
शहरात भीमा नदीकाठी
वीट भट्टीत मजुरी करणारे बबलू मिलिंद चव्हाण (वय २८) या तरुणाने मुस्लिम समाजातील
विधवा महिलेबरोबर लग्न केल्याने त्यांच्या पत्नीला कुमेल जब्बार कुरेशी (वय ४०), आसिफ अरिफ शेख (वय ३५,
दोघे रा. कुंभार गल्ली, दौंड) व आझम इस्माईल
शेख ( वय ५४, रा. अकबरनगर, औरंगाबाद
रोड, नगर) या तिघांनी घटस्फोट घेण्यासाठी दबाब टाकला होता.
पत्नीने नकार दिल्यानंतर बबलू चव्हाण यांना मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी दमदाटी
करण्यात आली. परंतु बबलू यांनी नकार दिल्याने १४ ऑक्टोबर २०२२ रोजी त्यांच्या घरात
कुमेल कुरेशी याच्या पुढाकाराने बळजबरीने सुंता करण्यात आली.
या प्रकरणातील संशयित
आरोपी कुमेल जब्बार कुरेशी,
आसिफ अरिफ शेख व सुंता
करणारा आझम इस्माईल शेख या तिघांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने या तिघांना न्यायालयासमोर
हजर करण्यात आले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या
सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील
समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा
!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84