पुणे, दि. 20 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): डी
मार्ट मधील वस्तूंवरील बारकोड टॅग काढून त्याजागी दुसऱ्या वस्तूंवरील कमी किंमतीचे
टॅग लावून फसवणूक करण्याचा प्रकार आज समोर आला.
या प्रकरणी पोलिसांनी
दिलेल्या माहितीनुसार, तीन महिला रविवारी दुपारी डी मार्टमध्ये खरेदीसाठी गेल्या होत्या. या वेळी
त्यांनी दोन बॅग, दोन पर्स, एक बूट आणि
एक पाण्याची बाटली खरेदी केली. या वस्तूंवरील बारकोड काढून त्यांनी कमी किंमतीच्या
वस्तूंचे बारकोड या वस्तूंवर लावले. बिलिंग काउंटरवर बारकोड स्कॅन केल्यावर तेथील
कर्मचाऱ्यांना वस्तूंच्या किमतीत तफावत आढळून आली. त्यामुळे त्यांचा संशय बळावला.
या वेळी डी मार्ट
मधील कर्मचाऱ्यांनी या महिलांनी जेथून वस्तू खरेदी केल्या तेथील सीसीटीव्ही फुटेज
तपासले. यामध्ये बारकोडची फेरफार करताना या तिघी दिसून आल्या.
या प्रकरणी गौसिया
अब्दुलरहीम बांगी, बिबीआयेशा अब्दुलरहीम बांगी आणि जुलेखा अब्दुलरहीम बांगी (तिघी. रा.
सागरमाळ, जवाहरनगर, कोल्हापूर)
यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या महिला एकाच कुटुंबातील असून त्यांच्यावर डी
मार्टची ४ हजार ४५३ रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
शाहूपुरी पोलिसांनी
ही कारवाई केली.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे.
माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल
तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या
९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84