पुणे, दि. 24 डिसेंबर 2022 (चेकमेट टाईम्स): सध्याच्या तरुणाईमध्ये लिव्ह-इन-रिलेशनशिपचे आकर्षण आहे. मागील काही वर्षात लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्यांची संख्या वाढली असतानाच दोघांमध्ये लहान-सहान गोष्टींवरून होणारे वादही वाढले आहेत. काही वेळा त्यातून गंभीर गुन्हे घडतात. असाच एक प्रकार ४० वर्षीय महिला आणि ५० वर्षीय पुरुष यांच्याबाबत समोर आला आहे.
लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या पार्टनरसोबत बिनसल्यानंतर ५० वर्षीय प्रियकराने ४० वर्षीय महिलेचे खासगी फोटो सोशल मीडियावर टाकले.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिला घटस्फोटीत आहे. मागील काही दिवसांपासून ती फिर्यादीसोबत लिव्ह-इन-रिलेशनशिप मध्ये राहत होती. दोघेही येवलेवाडी परिसरात भाड्याच्या घरात राहत होते. दरम्यान मागील तीन ते चार महिन्यांपासून त्यांच्यात वाद सुरू झाले आणि तेव्हापासून ते वेगळे राहू लागले. या दोघांतील वाद इतके टोकाला गेलेत की आरोपीने प्रेयसीचे खाजगी फोटो स्वतःच्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट केले. हा प्रकार जेव्हा फिर्यादी महिलेच्या लक्षात आला तेव्हा तिने त्याला फोन करून याविषयी जाब विचारला.
या संपूर्ण प्रकारानंतर फिर्यादी महिलेने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी 354 क, 500, 507, आयटी ऍक्ट 66 ई आणि 67 या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84