Type Here to Get Search Results !

बारामती राज्यमार्गावरील पुलावरून शाळकरी मुलींच्या सहलीची बस कोसळली; २७ मुली जखमी

 

पुणे, दि. 31 डिसेंबर 2022 (चेकमेट टाईम्स): बारामती-पाहुणेवाडी हद्दीतून जाणाऱ्या राज्यमार्गावरील पुलावरून शाळकरी मुलींच्या सहलीची बस (ट्रॅव्हल्स) आज पाहटे चार वाजल्याच्या सुमारास कोसळली.

 

घटनेचे गांभीर्य विचारात घेत माळेगाव, वडगाव निंबाळकर आणि बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक रहिवाशीच्या मदतीने पोलिसांनी १०८ रुग्णवाहिकेबरोबरच पोलीस गाडीतून संबंधित अपघातग्रस्त मुलींना बारामती महिला रुग्णालयात पुढील उपचारासाठी भरती केले.

 

या अपघातात ३ मुली गंभीर, तर २४ मुली किरकोळ जखमी झाल्या. बारामती महिला हाॅस्पीटलमध्ये जखमी मुलींवर पुढील वैद्यकिय उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकिय सूत्रांनी सांगितले. अपघातग्रस्त यशदा ट्रॅव्हल्स मध्ये एकूण ४८ मुली, पाच शिक्षक प्रवास करीत होते.

 

तसेच दोन चालकांपैकी श्रीपाद पाटील हा अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स चालवित होता. पहाटेच्यावेळी चालकाच्या डोळ्यावर झोप लागल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटला असावा, अथवा रस्त्यावरील पुल व वळणाचा आंदाज न आल्याने वरील अपघात घडला असावा, असा आंदाज प्रथमदर्शनी पोलिसांनी वर्तविला आहे.

 

या बाबत अधिक माहिती सांगता पोलीस निरिक्षक किरण अवचर म्हणाले,”इचलकरंजी-कोल्हापूर येथील खासगी ‘सागर क्लासेस’ची ८ वी ते १० इयत्तेमधील मुलींची सहल यशदा ट्रॅव्हल्समधून शिर्डी येथे गेली होती. सदरची सहल संपवून आज मंगळवारी पहाटे साडेतीन ते चार वाजल्याच्या सुमारास ही ट्रॅव्हल्स बारामतीकडून फलटण मार्गे निघाली होती. वरील ट्रॅव्हलच्या चालकाचा पाहुणेवाडी येथील पुलावर गाडीचा ताबा सुटला. गाडी ओढ्यात कोसळली. त्यामध्ये तीन मुली गंभीर जखमी झाल्या असून २४ मुलींना किरकोळ शारीरिक इजा झाली आहे. सध्यातरी कोणतीही जिवीत हाणी झाली नाही.”

 

पाहुणेवाडी येथील पुलाची दुरावस्था झाली आहे. रस्त्यामध्ये पडलेले खड्डे जीवघेणे झाले आहे. दिशादर्शक फलक नाहीत. परिणामी सातत्याने लहान मोठे अपघात होत आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली, तर रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार, असे सांगितले जाते. परंतु अजूनसुद्धा रस्त्याचे अथवा पुलाचे काम धोकादायक स्थितीत आहे. वास्तविक रस्त्यांच्या समस्यांमुळेच शाळकरी मुलींचा अपघात झाला आहे, असे म्हणणे सरपंच जयराम तावरे, पोलीस पाटील सुरेश काटे यांचे आहे.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes  

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.