पुणे, दि. 29 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स):
२६ रोजी रात्रीच्या सुमारास नागपूर हद्दीतील जमीन
गट नंबर ४४७ मधील बांधावरून शेतकरी गणपत अर्जुन भोर (रा. रांजणी ता. आंबेगाव)
यांच्या मालकीची बाभळीची झाडे परस्पर तोडून नेली. याबाबतची फिर्याद गणपत भोर यांनी
दिल्यानंतर सात जणांवर पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी २ लाख ३६
हजार ५०० रुपयांची लाकडे,
एक ट्रॅक्टर, लाकडे कापण्याची करवत, १०० फूट वायर, ४ लोखंडी कुऱ्हाडी असे जप्त केले
आहे.
या प्रकरणात
गुन्हेगारांच्या यादीत मधुसूदन मुरलीधर भोर, विजय कोंडाजी वाघ, धनंजय
गंगाराम वाघ (सर्व रा. रांजणी कारफाटा ता. आंबेगाव), योगेश
नानाभाऊ भोर (रा. नागपूर ता. आंबेगाव), सुखदेव किसन केदार,
बाळू न्हनु माने (दोघे रा. मांजरवाडी ता. जुन्नर), दत्तु वसंत केवाळी (रा. चांडोली ता. आंबेगाव) यांची नवे आहेत.
पारगाव पोलीस
ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. ईचके
पुढील तपास करत आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या
सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील
समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा
!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84