पुणे, दि. 31 डिसेंबर 2022 (चेकमेट टाईम्स): नियोजित गृहप्रकल्पात पाचव्या मजल्यावर काम करणारा
बांधकाम मजूर तोल जाऊन पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना बाणेर भागात घडली
आहे. रामू धनसिंग निनावत (सध्या रा. स्वराज बिल्डकाॅन, बाणेर) असे मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम
मजुराचे नाव आहे.
बाणेर भागातील नियोजित गृहप्रकल्पात पाचव्या मजल्यावर
निनावत प्लास्टर काम करत होते. त्या वेळी पाचव्या मजल्यावरून तोल जाऊन पडल्याने
निनावत गंभीर जखमी झाले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलीस तपासात
ठेकेदाराने सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने दुर्घटना घडल्याचे उघडकीस आले.
याबाबत संतोष बिनावत (वय २५, रा. सुतारदरा, कोथरूड)
याने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी डी. के. एंटरप्रायजेस
या ठेकेदार कंपनीच्या मालकासह एका अभियंत्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक सचिन गाडेकर पुढील तपास करत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या
सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील
समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा
!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84