Type Here to Get Search Results !

बिल्डरच्या घरी ५७ तोळ्याच्या सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारलेले लातूरचे जोडपे गजाआड

 

पुणे, दि. 31 डिसेंबर 2022 (चेकमेट टाईम्स): कल्याणीनगर येथील एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरात घरकामासाठी असलेल्या दांपत्यानेच रोकड आणि 57 तोळे सोन्या चांदीचे दागिने चोरी करून पोबारा केला होता.

 

बांधकाम व्यावसायिक त्यांच्या कुटुंबीयासह पर्यटनासाठी अलिबाग येथे गेल्यानंतर दोघांनी डल्ला मारून पोबारा केला होता. येरवडा पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांच्या आत नागपूर येथून या दांपत्याला अटक केली आहे. त्यांच्याकडून अडीच लाखांची रोकड, 49 तोळे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

 

राजपाल वामन हारगे (39, रा. कल्याणीनगर, मूळ. रा. लातूर), उर्मिला हारगे (38) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. राजपाल हारगे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, तो मूळचा लातूर येथील आहे. त्याच्यावर 2012 मध्ये खुनाचा गुन्हा दाखल आहे. तो कारागृहात असताना पळूनदेखील गेला होता. त्याच्यावर इतरदेखील गुन्हे दाखल आहेत.

 

फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक असून, कल्याणीनगर येथे वास्तव्यास आहेत. मागील पाच ते सहा महिन्यांपासून त्यांच्याकडे हारगे दांपत्य कामासाठी होते. राजपाल हा ऑफिसमध्ये, तर त्याची पत्नी उर्मिला ही घरामध्ये काम करत होती. त्यांना राहण्यासाठी व्यावसायिकाच्या बंगल्याशेजारीच रूम उपलब्ध करून देण्यात आली होती.

 

सोमवारी (दि. 26 डिसेंबर 2022) बांधकाम व्यावसायिक आपल्या कुटुंबीयासह अलिबाग येथे फिरायला गेले होते. या दरम्यान दोघांनी बंगल्याच्या तळमजल्यावरील बाथरूमच्या खिडकीचे ग्रील तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील 57 तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला.

 

बांधकाम व्यावसायिक घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तत्काळ येरवडा पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून येरवडा पोलिसांनी आरोपीचा माग काढत नागपूर येथून त्यांना अटक केली. त्यांच्याकडून रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा 27 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

अप्पर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे, स्वप्नाली गायकवाड, अमजद शेख, सागर जगदाळे, दत्ता शिंदे, सूरज ओंबासे, कैलास डुकरे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास सहायक निरीक्षक रवींद्र आळेकर करत आहेत.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes  

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.